<font face="mangal" size="3px">भारतीय रिजर्व बँकेने रायगड सहकारी बँक लिमिट - आरबीआय - Reserve Bank of India
भारतीय रिजर्व बँकेने रायगड सहकारी बँक लिमिटेड., मुंबई वर आर्थिक दंड ठोठावला
20 मार्च, 2023 भारतीय रिजर्व बँकेने रायगड सहकारी बँक लिमिटेड., मुंबई वर आर्थिक दंड ठोठावला भारतीय रिजर्व बँकेने 16 मार्च, 2023 रोजीच्या आदेशाद्वारे रायगड सहकारी बँक लिमिटेड., मुंबई (बँक) वर लादलेल्या सुपरवायझरी अॅक्शन फ्रेमवर्क (एसएएफ) अंतर्गत जारी केलेल्या ऑपरेशनल निर्देशांचे पालन न केल्यामुळे/उल्लंघन केल्याबद्दल ₹1 लाख (केवळ एक लाख रुपये) चा आर्थिक दंड ठोठावला आहे. बँकिंग नियमन कायदा, 1949 (BR कायदा) कलम 46(4)(i) आणि 56 सह लागू असलेल्या कलम 47A(1)(c) अन्वये भारतीय रिजर्व बँकेला प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून हा दंड ठोठावण्यात आला आहे. ही कृती नियामक अनुपालनातील कमतरतांवर आधारित आहे आणि यामधे बँकेने तिच्या ग्राहकांसोबत केलेल्या कोणत्याही व्यवहाराच्या किंवा कराराच्या वैधतेवर प्रश्न चिन्ह उपस्थित करण्याचा हेतू नाही. पार्श्वभूमी 31 मार्च 2021 रोजीच्या आर्थिक स्थितीच्या संदर्भात आरबीआयने बँकेची केलेली वैधानिक तपासणी आणि जोखीम मूल्यांकन अहवाल, तपासणी अहवाल आणि त्याच्याशी संबंधित सर्व संबंधित पत्रव्यवहाराची तपासणी, यावरून असे निदर्शनास आले की, भारतीय रिजर्व बँकेने वर नमूद केलेल्या बँकेवर लादलेल्या सुपरवायझरी अॅक्शन फ्रेमवर्क (एसएएफ) अंतर्गत जारी केलेल्या ऑपरेशनल निर्देशांचे उल्लंघन करत कर्जदारांना नवीन सोने कर्ज मंजूर केले. त्याच्या पुढे बँके ला कारण दाखवा नोटीस बजावण्यात आली होती ज्यात बँके ला भारतीय रिजर्व बँकेने बँकेवरती लादलेल्या सुपरवायझरी अॅक्शन फ्रेमवर्क (एसएएफ) अंतर्गत जारी केलेल्या ऑपरेशनल निर्देशांचे उल्लंघन केल्याबद्दल दंड का आकारण्यात येवू नये याची कारणे दाखवा अशी विचारणा करण्यात आली होती. नोटिशीला बँकेचे दिलेल्या लिखित उत्तराचा विचार केल्यानंतर, भारतीय रिजर्व बँकेने निष्कर्ष काढला की वरील प्रमाणे भारतीय रिजर्व बैंकेच्या निर्देशांचे पालन न केल्याचा आरोप सिद्ध झाला आहे आणि अशा निर्देशाचे अवज्ञा केल्यामुले अर्थिक दंद लादने आवशक आहे। (योगेश दयाल) प्रेस प्रकाशनी: 2022-2023/1892 |