RbiSearchHeader

Press escape key to go back

Past Searches

Page
Official Website of Reserve Bank of India

Notification Marquee

RBI Announcements
RBI Announcements

RbiAnnouncementWeb

RBI Announcements
RBI Announcements

Asset Publisher

133667383

भारतीय रिझर्व बँकेने साईबाबा नागरी सहकारी बँक मर्यादित, सेलू, (महाराष्ट्र) वर आर्थिक दंड ठोठावला

भारतीय रिझर्व बँकेने (आरबीआई) दिनांक 24 जून 2025, रोजीच्या आदेशाद्वारे, साईबाबा नागरी सहकारी बँक मर्यादित, सेलू, महाराष्ट्र (बँक) वर आरबीआई ने जारी केलेल्या ‘आपला ग्राहक जाणून घ्या (केवायसी)’ यासंबंधी काही दिशानिर्देशांचे पालन न केल्याबद्दल ₹50,000/- (रुपये पन्नास हजार केवळ) चा आर्थिक दंड ठोठावला आहे. बँकिंग नियमन कायदा, 1949 (BR कायदा) च्या कलम 46(4)(i) आणि कलम 56 सह लागू असलेल्या कलम 47A(1)(c) अन्वये आरबीआई ला प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करून हा दंड ठोठावण्यात आला आहे.

31 मार्च 2024 रोजीच्या आर्थिक स्थितीवर आधारित बँकेची वैधानिक तपासणी आरबीआई द्वारे केली गेली होती. या तपासणी अहवालातील, RBI च्या निर्देशांचे पालन न केल्याचे पर्यवेक्षी निष्कर्ष आणि यासंबंधी केलेल्या पत्रव्यवहाराच्या आधारे बँकेला नोटीस बजावण्यात आली होती, त्याद्वारे, वरील दिशानिर्देशांचे पालन करण्यास अयशस्वी झाल्याबद्दल बँकेला दंड का आकारला जाऊ नये याची कारणे दाखवा अशी विचारणा करण्यात आली होती. नोटीसला बँकेने दिलेले उत्तर, त्यानंतर सादर केलेले अतिरिक्त निवेदन व वैयक्तिक सुनावणीच्या वेळी बँकेने सादर केलेले तोंडी निवेदन विचारात घेता आरबीआई या निष्कर्षावर पोहोचली की बॅंकेने आरबीआई च्या खालील दिशानिर्देशांचे पालन न केल्याचे आरोप सिद्ध होतात आणि आर्थिक दंड लावला जाणे आवश्यक आहे.

बँक

  1. काही ग्राहकांचे केवायसी रेकॉर्ड निर्धारित वेळेत सेंट्रल केवायसी रेकॉर्ड रजिस्ट्री (CKYCR) वर अपलोड करण्यात ; आणि
     
  2. विहित कालावधीनुसार काही ग्राहकांच्या केवायसी (KYC) चे नियतकालिक अद्यतन करण्यात अयशस्वी ठरली आहे.

 

ही कृती नियामक अनुपालनातील कमतरतांवर आधारित आहे आणि यात बँकेने तिच्या ग्राहकांशी केलेल्या कोणत्याही व्यवहारांच्या किवा करारांच्या वैधतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्याचा हेतू नाही. तसेच, बँकेविरुद्ध आरबीआई ने सुरू केलेल्या इतर कोणत्याही कारवाईबद्दल पूर्वग्रह न ठेवता हा आर्थिक दंड लावला आहे.

 

 

(पुनीत पंचोली)  
मुख्य महाप्रबंधक

प्रेस प्रकाशनी: 2025-2026/629

RbiTtsCommonUtility

प्ले हो रहा है
ऐका

Related Assets

RBI-Install-RBI-Content-Global

RbiSocialMediaUtility

भारतीय रिझर्व्ह बँक मोबाईल ॲप्लिकेशन इंस्टॉल करा आणि नवीनतम बातम्यांचा त्वरित ॲक्सेस मिळवा!

आमचे अ‍ॅप इंस्टॉल करण्यासाठी QR कोड स्कॅन करा

RbiWasItHelpfulUtility

पेज अंतिम अपडेट तारीख:

हे पेज उपयुक्त होते का?