भारतीय रिजर्व बँकेने संख्या फाइनेंसियल सर्विसेज प्राइवेट लिमिटेड, मुंबई वर आर्थिक दंड ठोठावला
|
भारतीय रिजर्व बँकेने 29 डिसेंबर 2025 रोजीच्या आदेशाद्वारे संख्या फाइनेंसियल सर्विसेज प्राइवेट लिमिटेड, मुंबई (कंपनी) वर ‘गाइडलाइंस ऑन परचेस/सेल ऑफ नॉन पेरफोरमिंग आससेट्स’ यावर दिलेल्या काही सूचनांचे पालन न केल्याबद्दल ₹40,000 (केवळ चाळीस हजार रुपये) चा आर्थिक दंड ठोठावला आहे. कंपनीने कलम 58G च्या उप-कलम (1) मधील खंड (b), कलम 58B च्या उप-कलम (5) मधील खंड (aa) सह प्रदान केलेल्या भारतीय रिजर्व बँकेमध्ये निहित अधिकारांचा वापर करून हा दंड ठोठावण्यात आला आहे. भारतीय रिजर्व बँकेद्वारे कंपनीची अपात्र संस्थेला ताणतणावग्रस्त मालमत्ता देण्याच्या तक्रारीच्या संदर्भात तपासणी केली असता, आरबीआयच्या निर्देशांचे पालन न केल्याचे उघड झाले. त्याच आधारावर, कंपनीला नोटीस बजावण्यात आली होती, ज्यामध्ये म्हटल्याप्रमाणे, वरील निर्देशांचे पालन करण्यात अयशस्वी झाल्याबद्दल कंपनीला दंड का लावला जाऊ नये याची कारणे दाखवा अशी विचारणा करण्यात आली होती. नोटिशीला कंपनीचे उत्तर आणि वैयक्तिक सुनावणी दरम्यान केलेले तोंडी सादरीकरण यांचा विचार केल्यानंतर, भारतीय रिजर्व बँकेला, आढळले की, कंपनी विरुद्ध पुढील आरोप कायम आहे, ज्यामुळे कंपनीवर आर्थिक दंड आकारला जाणे आवश्यक आहे. कंपनीने एका अपात्र संस्थेला अनुत्पादक मालमत्ता दिली होती. ही कृती नियामक अनुपालनातील कमतरतांवर आधारित आहे आणि यामधे कंपनीने तिच्या ग्राहकांसोबत केलेल्या कोणत्याही व्यवहाराच्या किंवा कराराच्या वैधतेवर प्रश्न चिन्ह उपस्थित करण्याचा हेतू नाही. याशिवाय, हा आर्थिक दंड लादणे हे बँकेच्या विरोधात आरबीआयने सुरू केलेल्या इतर कोणत्याही कारवाईचा पूर्वग्रह न ठेवता आहे. (ब्रिज राज) प्रेस प्रकाशनी: 2025-2026/1854 |
पेज अंतिम अपडेट तारीख: