RbiSearchHeader

Press escape key to go back

Past Searches

Theme
Theme
Text Size
Text Size
S2

Notification Marquee

RBI Announcements
RBI Announcements

RbiAnnouncementWeb

RBI Announcements
RBI Announcements

Asset Publisher

104383563

भारतीय रिझर्व्ह बँकेने श्रीजी भाटिया को-ऑपरेटीवीव्ह बँक लिमिटेड, मुंबई महाराष्ट्र वर आर्थिक दंड ठोठावला

7 ऑगस्ट 2023

भारतीय रिझर्व्ह बँकेने श्रीजी भाटिया को-ऑपरेटीवीव्ह बँक लिमिटेड, मुंबई महाराष्ट्र वर आर्थिक दंड ठोठावला

भारतीय रिझर्व्ह बँकेने 03 जुलै 2023 रोजीच्या आदेशाद्वारे श्रीजी भाटिया को-ऑपरेटीवीव्ह बँक लिमिटेड, मुंबई महाराष्ट्र (बँक) वर आरबीआयने जारी केलेल्या सुपरवायझरी अॅक्शन फ्रेमवर्क (SAF) मध्ये असलेल्या विशिष्ट निर्देशांचे आणि KYC (केवायसी) निर्देश, 2016 यासंदर्भात भारतीय रिझर्व्ह बँकेने जारी केलेल्या निर्देशांचे पालन न केल्याबद्दल 1 लाख (केवळ एक लाख रुपये) चा आर्थिक दंड ठोठावला आहे. बँकिंग नियमन कायदा, 1949 (BR कायदा) कलम 46(4)(i) आणि 56 सह लागू असलेल्या कलम 47A(1)(c) अन्वये भारतीय रिझर्व्ह बँकेला प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून हा दंड ठोठावण्यात आला आहे.

ही कृती नियामक अनुपालनातील कमतरतांवर आधारित आहे आणि यामधे बँकेने तिच्या ग्राहकांसोबत केलेल्या कोणत्याही व्यवहाराच्या किंवा कराराच्या वैधतेवर प्रश्न चिन्ह उपस्थित करण्याचा हेतू नाही.

पार्श्वभूमी

31 मार्च 2022 रोजीच्या आर्थिक स्थितीच्या संदर्भात आरबीआयने बँकेची केलेली वैधानिक तपासणी आणि जोखीम मूल्यांकन अहवाल, तपासणी अहवाल आणि त्याच्याशी संबंधित सर्व संबंधित पत्रव्यवहाराची तपासणी, यावरून असे निदर्शनास आले की, सुपरवायझरी अॅक्शन फ्रेमवर्क (SAF) निर्देशांचे उल्लंघन करून, बँकेने आरबीआयच्या पूर्वपरवानगीशिवाय भांडवली खर्च केला होता आणि बँकेने आपल्या विद्यमान ग्राहकांच्या जोखमीच्या वर्गीकरणाचा नियतकालिक आढावा घेतला नाही. त्याच पुढे, बँकेला नोटीस बजावण्यात आली होती ज्यात बँकेला त्यात नमूद केल्याप्रमाणे RBI निर्देशांचे उल्लंघन केल्याबद्दल दंड का लागू करू नये याची कारणे दाखवा अशी विचारणा करण्यात आली होती.

नोटिशीला बँकेने दिलेल्या उत्तराचा विचार केल्यानंतर, भारतीय रिझर्व्ह बँकेने निष्कर्ष काढला की वरील प्रमाणे भारतीय रिझर्व्ह बैंकेच्या निर्देशांचे पालन न केल्याचा आरोप सिद्ध झाला आहे आणि अशा निर्देशांचे पालन न करण्याच्या मर्यादेपर्यंत आर्थिक दंड आकारला जाणे आवश्यक आहे.

(योगेश दयाल) 
मुख्य महाप्रबंधक

प्रेस प्रकाशनी: 2023-2024/707

RbiTtsCommonUtility

प्ले हो रहा है
ऐका

Related Assets

RBI-Install-RBI-Content-Global

RbiSocialMediaUtility

भारतीय रिझर्व्ह बँक मोबाईल ॲप्लिकेशन इंस्टॉल करा आणि नवीनतम बातम्यांचा त्वरित ॲक्सेस मिळवा!

Scan Your QR code to Install our app

RbiWasItHelpfulUtility

हे पेज उपयुक्त होते का?