<font face="mangal" size="3">भारतीय रिजर्व बँकेने श्री कन्यका नागरी सहकाë - आरबीआय - Reserve Bank of India
भारतीय रिजर्व बँकेने श्री कन्यका नागरी सहकारी बँक लिमिटेड, चंद्रपूर, महाराष्ट्र वर आर्थिक दंड ठोठावला
12 डिसेंबर 2022 भारतीय रिजर्व बँकेने श्री कन्यका नागरी सहकारी बँक लिमिटेड, चंद्रपूर, महाराष्ट्र वर आर्थिक दंड ठोठावला भारतीय रिजर्व बँकेने आपल्या दिनांक ५ डिसेंबर २०२२ च्या आदेशाद्वारे श्री कन्यका नागरी सहकारी बँक लिमिटेड, चंद्रपूर, महाराष्ट्र (बँक) वर भारतीय रिजर्व बँक द्वारे नागरी सहकारी बँकासाठी जाहीर केलेल्या तुमचा ग्राहक ओळखा (केवायसी) यावर जारी केलेल्या निर्देशांचे उल्लंघन/पालन न केल्याबद्दल ₹४.00 लाख (केवळ चार लाख रुपये) चा आर्थिक दंड ठोठावला आहे. भारतीय रिजर्व बँकेने जाहीर केलेल्या उपरोक्त निर्देशांचे पालन करण्यास बँक असमर्थ राहिली हि गोष्ट लक्षात घेता बँकिंग नियमन कायदा, १९४९ च्या कलम ४६ (४) (i) आणि कलम ५६ सह वाचलेल्या ४७ ए (१) (सी) मध्ये अंतर्भूत असलेल्या तरतुदीनुसार आपल्या अधिकाराचा वापर करीत हा दंड ठोठावण्यात आला आहे. ही कृती नियामक अनुपालनातील कमतरतांवर आधारित आहे आणि यामधे बँकेने तिच्या ग्राहकांसोबत केलेल्या कोणत्याही व्यवहाराच्या किंवा कराराच्या वैधतेवर प्रश्न चिन्ह उपस्थित करण्याचा हेतू नाही. पार्श्वभूमी ३१ मार्च २०२१ रोजीच्या आर्थिक स्थितीवर आधारित बँकेच्या तपासणी अहवालात, इतर बाबींसह असे दिसून आले कि बँकेने भारतीय रिजर्व बँकेद्वारे जारी उपरोक्त निर्देशाचे उल्लंघन/पालन न करता (i) खात्याच्या जोखीम वर्गीकरणाच्या पुनरावलोकनाची कोणतीही प्रणाली उपलब्ध नाही. (ii) आपल्या ग्राहकांच्या केवायसी चे नियमित अद्यतन करण्यासाठी कोणतीही प्रणाली ठेवली नाही आणि (iii) संशयास्पद व्यवहार ओळखण्यासाठी व निरीक्षण करण्यासाठी कोणतेही मजबूत सोफ्टवेयरचा वापर केला नाही. याच आधारे निर्देशांचे पालन न केल्यामुळे बँकेवर दंड का लादला जाऊ नये याची कारणे दाखवा असे सूचित करणारी नोटीस बँकेला बजावण्यात आली होती. या बाबतीत बँकेने दिलेले उत्तर, वैयक्तिक सुनावणीच्या वेळी बँकेने सादर केलेले तोंडी निवेदन विचारात घेता भारतीय रिजर्व बँक या निष्कर्षावर पोहोचली कि भारतीय रिजर्व बँकेच्या निर्देशांचे पालन न केल्याचे सिद्ध होते आणि आर्थिक दंड लावले जाणे आवश्यक आहे. (योगेश दयाल) प्रेस प्रकाशन: 2022-2023/1353 |