RbiSearchHeader

Press escape key to go back

Past Searches

Theme
Theme
Text Size
Text Size
S3

Notification Marquee

RBI Announcements
RBI Announcements

RbiAnnouncementWeb

RBI Announcements
RBI Announcements

Asset Publisher

108893618

भारतीय रिझर्व्ह बँकेने दी चेंबूर नागरिक सहकारी बँक लिमिटेड मुंबई, महाराष्ट्र वर आर्थिक दंड ठोठावला

04 डिसेंबर 2023

भारतीय रिझर्व्ह बँकेने दी चेंबूर नागरिक सहकारी बँक लिमिटेड मुंबई, महाराष्ट्र वर आर्थिक दंड ठोठावला

भारतीय रिझर्व्ह बँकेने 20 नोव्हेंबर 2023 रोजीच्या आदेशाद्वारे दी चेंबूर नागरिक सहकारी बँक लिमिटेड मुंबई,महाराष्ट्र (बँक) वर ‘ठेव खात्यांची देखभाल - प्राथमिक (शहरी) सहकारी बँका’ वरील भारतीय रिझर्व्ह बँकेच्या निर्देशांचे पालन न केल्यामुळे 1 लाख (केवळ एक लाख रुपये) चा आर्थिक दंड ठोठावला आहे. बँकिंग नियमन कायदा, 1949 (BR कायदा) कलम 46(4)(i) आणि 56 सह लागू असलेल्या कलम 47A(1)(c) अन्वये भारतीय रिझर्व्ह बँकेला प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून हा दंड ठोठावण्यात आला आहे.

ही कृती नियामक अनुपालनातील कमतरतांवर आधारित आहे आणि यामधे बँकेने तिच्या ग्राहकांसोबत केलेल्या कोणत्याही व्यवहाराच्या किंवा कराराच्या वैधतेवर प्रश्न चिन्ह उपस्थित करण्याचा हेतू नाही.

पार्श्वभूमी

31 मार्च 2022 रोजीच्या आर्थिक स्थितीच्या संदर्भात आरबीआयने बँकेची केलेली वैधानिक तपासणी आणि जोखीम मूल्यांकन अहवाल आणि त्याच्याशी संबंधित सर्व संबंधित पत्रव्यवहाराची तपासणी, यावरून असे निदर्शनास आले की बँकेने बचत खात्यांमध्ये विहित किमान शिल्लक न ठेवल्याबद्दल प्रमाणानुसार दंडात्मक शुल्क वसूल करण्याऐवजी निश्चित रक्कम वसूल केला होता. तसेच बँक तिच्या ग्राहकांना सूचित करण्यात अयशस्वी झाली की नोटीस मिळाल्यापासून एका महिन्याच्या आत खात्यात किमान शिल्लक पुनर्संचयित न झाल्यास, दंडात्मक शुल्क लागू होईल. परिणामी, बँकेला नोटीस बजावण्यात आली होती, ज्यामध्ये म्हटल्याप्रमाणे, वरील निर्देशांचे पालन करण्यात अयशस्वी झाल्याबद्दल बँकेला दंड का लावला जाऊ नये याची कारणे दाखवा अशी विचारणा करण्यात आली होती.

नोटिशीला बँकेने दिलेल्या उत्तराचा विचार केल्यानंतर, भारतीय रिझर्व्ह बँकेने निष्कर्ष काढला की वरील प्रमाणे भारतीय रिझर्व्ह बँकेच्या निर्देशांचे पालन न केल्याचा आरोप सिद्ध झाला आहे आणि अशा निर्देशांचे पालन न करण्याच्या मर्यादेपर्यंत आर्थिक दंड आकारला जाणे आवश्यक आहे.

(योगेश दयाल) 
मुख्य महाप्रबंधक

Press Release: 2023-2024/1406

RbiTtsCommonUtility

प्ले हो रहा है
ऐका

Related Assets

RBI-Install-RBI-Content-Global

RbiSocialMediaUtility

भारतीय रिझर्व्ह बँक मोबाईल ॲप्लिकेशन इंस्टॉल करा आणि नवीनतम बातम्यांचा त्वरित ॲक्सेस मिळवा!

Scan Your QR code to Install our app

RbiWasItHelpfulUtility

हे पेज उपयुक्त होते का?