RbiSearchHeader

Press escape key to go back

Past Searches

Page
Official Website of Reserve Bank of India

Notification Marquee

RBI Announcements
RBI Announcements

RbiAnnouncementWeb

RBI Announcements
RBI Announcements

Asset Publisher

78525180

भारतीय रिझर्व बँकेने जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक लिमिटेड, जळगाव (महाराष्ट्र) वर आर्थिक दंड ठोठावला

२० फेब्रुवारी, २०२३

भारतीय रिझर्व बँकेने जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक लिमिटेड, जळगाव (महाराष्ट्र) वर
आर्थिक दंड ठोठावला

भारतीय रिझर्व बँकेने दिनांक १४ फेब्रुवारी २०२३ रोजीच्या आदेशाद्वारे जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक लिमिटेड, जळगाव (महाराष्ट्र) वर भारतीय रिझर्व बँकेच्या, तुमचा ग्राहक ओंळखा (के वाय सी) या संदर्भात जारी केलेल्या निर्देशांचे उल्लंघन /पालन न केल्याबद्दल १.५० लाख (केवळ रुपये एक लाख पन्नास हजार) चा आर्थिक दंड ठोठावला आहे. उपरोक्त निर्देशांचे पालन करण्यास बँक असमर्थ राहिली हि बाब लक्षात घेता बँकिंग नियमन कायदा, १९४९ च्या कलम ४७ ए (१) (सी) आणि सह वाचलेल्या ४६ (४) (i) व कलम ५६ मध्ये अंतर्भूत असलेल्या तरतुदीनुसार भारतीय रिजर्व बँकेद्वारे आपल्या अधिकाराचा वापर करीत हा दंड लादण्यात आला आहे.

ही कृती नियामक अनुपालनातील कमतरतांवर आधारित आहे आणि यामधे बँकेने तिच्या ग्राहकांसोबत केलेल्या कोणत्याही व्यवहाराच्या किंवा कराराच्या वैधतेवर प्रश्न चिन्ह उपस्थित करण्याचा हेतू नाही.

पार्श्वभूमी

३१ मार्च २०२१ रोजीच्या आर्थिक स्तिथीवर आधारित बँकेच्या जोखीम मुल्यांकन तपासणी अहवालात, इतर बाबींसह असे दिसून आले कि बँकेने, भारतीय रिजर्व बँकेद्वारे जारी उपरोक्त निर्देशांचे उल्लंघन / पालन न करता आपल्या ग्राहकांच्या सर्व खात्यांचे जोखीम प्रवर्गात वर्गीकरण केलेले नाही. याच आधारे निर्देशांचे पालन न केल्यामुळे बँकेवर दंड का लादला जाऊ नये याची कारणे दाखवा असे सूचित करणारी नोटीस बँकेला बजावण्यात आली होती.

या बाबतीत बँकेने दिलेले उत्तर, वैयक्तीक सुनावणीच्या वेळी बँकेने सादर केलेले तोंडी निवेदन विचारात घेता भारतीय रिजर्व बँक या निष्कर्षावर पोहोचली कि भारतीय रिझर्व बँकेच्या निर्देशांचे पालन न केल्याचे सिद्ध होते आणि आर्थिक दंड लावले जाने आवश्यक आहे.

(योगेश दयाल) 
मुख्य महाप्रबंधक

प्रेस प्रकाशनी: 2022-2023/1749

RbiTtsCommonUtility

प्ले हो रहा है
ऐका

Related Assets

RBI-Install-RBI-Content-Global

RbiSocialMediaUtility

भारतीय रिझर्व्ह बँक मोबाईल ॲप्लिकेशन इंस्टॉल करा आणि नवीनतम बातम्यांचा त्वरित ॲक्सेस मिळवा!

आमचे अ‍ॅप इंस्टॉल करण्यासाठी QR कोड स्कॅन करा

RbiWasItHelpfulUtility

पेज अंतिम अपडेट तारीख:

हे पेज उपयुक्त होते का?