<font face="Mangal" size="3px">दि कापडवंज पिपल्स सहकारी बँक लि., कापडवंज, जिलî - आरबीआय - Reserve Bank of India
दि कापडवंज पिपल्स सहकारी बँक लि., कापडवंज, जिल्हा खेडा (गुजराथ) ह्यांना आरबीआयकडून आर्थिक दंड जारी
फेब्रुवारी 15, 2016 दि कापडवंज पिपल्स सहकारी बँक लि., कापडवंज, जिल्हा खेडा (गुजराथ) बँकिंग रेग्युलेशन अधिनियम, 1949 (सहकारी सोसायट्यांना लागु असलेला) च्या कलम 46(4) सह वाचित कलम 47 अ(1)(ब) च्या तरतुदींखाली तिला मिळालेल्या अधिकारांचा वापर करुन, भारतीय रिझर्व बँकेने, दि कापडवंज पिपल्स सहकारी बँक लि., कापडवंज, जिल्हा खेडा (गुजराथ) ह्यांना पुढील उल्लंघनांसाठी रु.2 लाख (रुपये दोन लाख) दंड ठोठावला आहे – बी.आर. अधिनियम, 1949 (एएसीएस) च्या कलम 36(1) खाली दिलेल्या कार्यकारी सूचनांचे; आणि स्वतःचे हितसंबंध गुंतले आहेत असे संचालक/त्यांचे नातेवाईक/संस्था ह्यांना कर्जे व अग्रिम राशी देणे बाबतच्या, तुमचा ग्राहक जाणा (केवायसी)/अँटी मनी लॉडरिंग (एएमएल) निकष व कोअर बँकिंग सोल्युशन्स ह्याबाबत, रिझर्व बँकेने दिलेल्या मार्गदर्शक तत्वांचे उल्लंघन. रिझर्व बँकेने वरील बँकेला एक कारणे दाखवा नोटिस पाठविली होती आणि तिला त्या बँकेने लेखी पत्र सादर केले होते. ह्या प्रकरणातील सत्य गोष्टी व प्रत्यक्ष/वैय्यक्तिक केलेले सादरीकरण विचारात घेऊन, रिझर्व बँकेने निष्कर्ष काढला की वरील उल्लंघने झाली असून त्यासाठी दंड लावणे आवश्यक आहे. अजित प्रसाद वृत्तपत्र निवेदन : 2015-2016/1925 |