RbiSearchHeader

Press escape key to go back

Past Searches

Page
Official Website of Reserve Bank of India

Notification Marquee

RBI Announcements
RBI Announcements

RbiAnnouncementWeb

RBI Announcements
RBI Announcements

Asset Publisher

78525208

भारतीय रिजर्व बँकेने दी सातारा सहकारी बँक लिमिटेड., मुंबई वर आर्थिक दंड ठोठावला

February 20, 2023

भारतीय रिजर्व बँकेने दी सातारा सहकारी बँक लिमिटेड., मुंबई वर आर्थिक दंड ठोठावला

भारतीय रिजर्व बँकेने 15 फेब्रुवारी 2023 रोजीच्या आदेशाद्वारे दी सातारा सहकारी बँक लिमिटेड., मुंबई (बँक) वर रिजर्व बँकेने अग्रिम आणि एक्सपोजर नियमांचे व्यवस्थापन आणि वैधानिक/इतर निर्बंध-UCBs या संबंधित जारी केलेल्या निर्देशांचे पालन न केल्यामुळे/उल्लंघन केल्याबद्दल 4 लाख (केवळ चार लाख रुपये) चा आर्थिक दंड ठोठावला आहे. बँकिंग नियमन कायदा, 1949 (BR कायदा) कलम 46(4)(i) आणि 56 सह लागू असलेल्या कलम 47A(1)(c) अन्वये भारतीय रिजर्व बँकेला प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून हा दंड ठोठावण्यात आला आहे.

ही कृती नियामक अनुपालनातील कमतरतांवर आधारित आहे आणि यामधे बँकेने तिच्या ग्राहकांसोबत केलेल्या कोणत्याही व्यवहाराच्या किंवा कराराच्या वैधतेवर प्रश्न चिन्ह उपस्थित करण्याचा हेतू नाही.

पार्श्वभूमी

31 मार्च 2021 रोजीच्या आर्थिक स्थितीच्या संदर्भात आरबीआयने बँकेची केलेली वैधानिक तपासणी आणि जोखीम मूल्यांकन अहवाल, तपासणी अहवाल आणि त्याच्याशी संबंधित सर्व संबंधित पत्रव्यवहाराची तपासणी, यावरून असे निदर्शनास आले की, बँकेकडे निधीच्या अंतिम वापरावर लक्ष ठेवण्यासाठी योग्य यंत्रणा नव्हती आणि मर्यादेपेक्षा जास्त असुरक्षित अग्रिम मंजूर केले होते. त्यानंतर, बँकेला नोटीस बजावण्यात आली होती ज्यात बँकेला त्यात नमूद केल्याप्रमाणे भारतीय रिजर्व बँकेच्या निर्देशांचे उल्लंघन केल्याबद्दल दंड का आकारण्यात येवू नये याची कारणे दाखवा अशी विचारणा करण्यात आली होती.

नोटिशीला बँकेचे उत्तर, बँकेचे अतिरिक्त सादरीकरण आणि वैयक्तिक सुनावणी दरम्यान केलेले तोंडी सादरीकरण यांचा विचार केल्यानंतर, भारतीय रिजर्व बँकेने निष्कर्ष काढला की वरील प्रमाणे भारतीय रिजर्व बैंकेच्या निर्देशांचे पालन न केल्याचा आरोप सिद्ध झाला आहे आणि अशा निर्देशांचे पालन न करण्याच्या मर्यादेपर्यंत आर्थिक दंड आकारला जाणे आवश्यक आहे.

(Yogesh Dayal)   
Chief General Manager

Press Release: 2022-2023/1758

RbiTtsCommonUtility

प्ले हो रहा है
ऐका

Related Assets

RBI-Install-RBI-Content-Global

RbiSocialMediaUtility

भारतीय रिझर्व्ह बँक मोबाईल ॲप्लिकेशन इंस्टॉल करा आणि नवीनतम बातम्यांचा त्वरित ॲक्सेस मिळवा!

आमचे अ‍ॅप इंस्टॉल करण्यासाठी QR कोड स्कॅन करा

RbiWasItHelpfulUtility

पेज अंतिम अपडेट तारीख:

हे पेज उपयुक्त होते का?