<font face="mangal" size="3">भारतीय रिजर्व बँकेने दि शिरपूर पीपल्स को-ऑपर - आरबीआय - Reserve Bank of India
भारतीय रिजर्व बँकेने दि शिरपूर पीपल्स को-ऑपरेटीव बँक लिमिटेड, शिररपूर (महाराष्ट्र) वर आर्थिक दंड ठोठावला
09 जानेवारी 2023 भारतीय रिजर्व बँकेने दि शिरपूर पीपल्स को-ऑपरेटीव बँक लिमिटेड, शिररपूर (महाराष्ट्र) भारतीय रिजर्व बँकेने आपल्या दिनांक ४ जानेवारी २०२३ च्या आदेशान्वये दि शिरपूर पीपल्स को-ऑपरेटीव बँक लिमिटेड, शिरपूर (महाराष्ट्र) (बँक) वर भारतीय रिजर्व बँक द्वारे नागरी सहकारी बँकासाठी जाहीर केलेल्या नागरी सहकारी बँकांच्या प्रकटीकरण मानदंड आणि/इतर निर्बंध, उत्पन्नाची ओळख आणि मालमत्तेचे वर्गीकरण (आयआरएसी) व तुमचे ग्राहक ओळखा (केवायसी) यावर जारी केलेल्या निर्देशांचे उल्लंघन/पालन न केल्याबद्दल ₹३.00 लाख (केवळ तीन लाख रुपये) चा दंड ठोठावला आहे. भारतीय रिजर्व बँकेद्वारे जारी केलेल्या उपरोक्त निर्देशांचे पालन करण्यास बँक असमर्थ राहिली हि गोष्ट लक्षात घेता बँकिंग नियमन कायदा, १९४९ च्या कलम ४७ (ए) (सी) आणि कलम ५६ सह वाचलेल्या ४६ (4) (ए) मध्ये अंतर्भूत असलेल्या तरतुदीनुसार आपल्या अधिकाराचा वापर करीत हा दंड ठोठावण्यात आला आहे. ही कृती नियामक अनुपालनातील कमतरतांवर आधारित आहे आणि यामधे बँकेने तिच्या ग्राहकांसोबत केलेल्या कोणत्याही व्यवहाराच्या किंवा कराराच्या वैधतेवर प्रश्न चिन्ह उपस्थित करण्याचा हेतू नाही. पार्श्वभूमी ३१ मार्च २०१९ व ३१ मार्च २०२० रोजीच्या आर्थिक स्थितीवर आधारित बँकेच्या तपासणी अहवालात, इतर बाबींसह असे दिसून आले कि बँकेने भारतीय रिजर्व बँकेद्वारे जारी उपरोक्त निर्देशांचे उलंघन/पालन न करता (i) अनुज्ञेय मर्यादेपेक्षा जास्त अग्रिम कर्जदारांच्या गटाला मंजूर केले होते, (ii) उत्पन्न ओळख आणि मालमत्ता वर्गीकरण नियमांचे (आयआरएसी) पालन केले नाही आणि (iii) संशयास्पद व्यवहार ओळखण्यासाठी व निरीक्षण करण्यासाठी कोणतेही मजबूत सॉफ्टवेअर उपलब्ध नाही. याच आधारे निर्देशांचे पालन न केल्यामुळे बँकेवर दंड का लादला जाऊ नये याची कारणे दाखवा असे सूचित करणारी नोटीस बँकेला बजावण्यात आली होती. या बाबतीत बँकेने दिलेले उत्तर, वैयक्तिक सुनावणीच्या वेळी बँकेने सादर केलेले तोंडी निवेदन व त्यानंतर सादर केलेली अतिरिक्त माहिती विचारात घेता भारतीय रिजर्व बँक या निष्कर्षावर पोहोचली कि भारतीय रिजर्व बँकेच्या दिशानिर्देश्कांचे पालन न केल्याचे सिद्ध होते आणि आर्थिक दंड लावले जाणे आवश्यक आहे. (योगेश दयाल) प्रेस प्रकाशन: 2022-2023/1518 |