RbiSearchHeader

Press escape key to go back

Past Searches

Theme
Theme
Text Size
Text Size
S3

Notification Marquee

RBI Announcements
RBI Announcements

RbiAnnouncementWeb

RBI Announcements
RBI Announcements

Asset Publisher

103375402

भारतीय रिजर्व बँकेने दि वैद्यनाथ को-ऑप बँक ली. बीड, महाराष्ट्र वर आर्थिक दंड ठोठावला

12 डिसेंबर 2022

भारतीय रिजर्व बँकेने दि वैद्यनाथ को-ऑप बँक ली. बीड, महाराष्ट्र वर आर्थिक दंड ठोठावला

भारतीय रिजर्व बँकेने दिनांक ५ डिसेंबर २०२२ रोजीच्या आदेशाद्वारे दि वैद्यनाथ को- ओप. बँक लि. बीड, महाराष्ट्र वर भारतीय रिझर्व बँकेच्या नागरी सहकारी बँकांसाठी तुमचा ग्राहक ओळखा (केवायसी) निर्देश, या संदर्भात जारी केलेल्या निर्देशांचे उल्लंघन / पालन न केल्याबद्दल २.५० लाख (केवळ रुपये दोन लाख पन्नास हजार) चा आर्थिक दंड ठोठावला आहे. उपरोक्त निर्देशांचे पालन करण्यास बँक असमर्थ राहिली ही बाब लक्षात घेता बँकिंग नियमन कायदा, १९४९ च्या कलम ४७ ए (१) (सी) आणि सह वाचलेल्या ४६ (४) (i) व कलम ५६ मध्ये अंतर्भूत असलेल्या तरतुदीनुसार भारतीय रिजर्व बँकेद्वारे आपल्या अधिकाराचा वापर करीत हा दंड ठोठावण्यात आला आहे.

ही कृती नियामक अनुपालनातील कमतरतांवर आधारित आहे आणि यामधे बँकेने तिच्या ग्राहकांसोबत केलेल्या कोणत्याही व्यवहाराच्या किंवा कराराच्या वैधतेवर प्रश्न चिन्ह उपस्थित करण्याचा हेतू नाही.

पार्श्वभूमी

३१ मार्च २०२१ रोजीच्या आर्थिक स्थितीवर आधारित बँकेच्या जोखीम मुल्यांकन अहवालात, इतर बाबींसह असे दिसून आले कि बँकेने भारतीय रिजर्व बँकेद्वारे जारी उपरोक्त निर्देशांचे उलंघन / पालन न करता (i) आपल्या ग्राहकांच्या केवायसी चे नियमित अद्यतन व (ii) नेमलेल्या कालक्रमानुसार सर्व खात्यांचे जोखीम प्रवर्गाचे पुनरावलोकन केले नाही. या संदर्भात बँकेला एक नोटीस पाठवण्यात आली होती ज्यात सदर अनुपालन न केल्याने दंड कां आकारण्यात येऊ नये याची कारणे द्यावी असे सुचविले होते.

या बाबतीत बँकेने दिलेले उत्तर, वैयक्तिक सुनावणीच्या वेळी बँकेने सादर केलेले तोंडी निवेदन विचारात घेता भारतीय रिजर्व बँक या निष्कर्षावर पोहोचली कि भारतीय रिजर्व बँकेच्या निर्देशांचे पालन न केल्याचे सिद्ध होते आणि आर्थिक दंड लावले जाने आवश्यक आहे.

(योगेश दयाल)    
मुख्य महाव्यवस्थापक

प्रेस प्रकाशन: 2022-2023/1346

RbiTtsCommonUtility

प्ले हो रहा है
ऐका

Related Assets

RBI-Install-RBI-Content-Global

RbiSocialMediaUtility

भारतीय रिझर्व्ह बँक मोबाईल ॲप्लिकेशन इंस्टॉल करा आणि नवीनतम बातम्यांचा त्वरित ॲक्सेस मिळवा!

Scan Your QR code to Install our app

RbiWasItHelpfulUtility

हे पेज उपयुक्त होते का?