दि वाशीम नागरी सहकारी बँक लि. वाशीम (महाराष्ट्र) ह्यांचेवर आरबीआयकडून आर्थिक दंड लागु
06 ऑक्टोबर, 2015 दि वाशीम नागरी सहकारी बँक लि. वाशीम (महाराष्ट्र) ह्यांचेवर बँकिंग विनियम अधिनियम, 1949 च्या (सहकारी सोसायट्यांना लागु असलेला) कलम 46(4) सह वाचित, कलम 47अ(1) ब च्या तरतुदींनी दिलेल्या अधिकारांचा वापर करुन भारतीय रिझर्व बँकेने, दि वाशीम नागरी सहकारी बँक लि., वाशीम (महाराष्ट्र) ह्यांना, तुमचा ग्राहक जाणा निकषांचे व आरबीआयच्या सूचनांचे उल्लंघन केल्याबद्दल रु.5.0 लाख (रुपये पाच लाख फक्त) एवढा आर्थिक दंड केला आहे. रिझर्व बँकेने वरील बँकेला, कारणे दाखवा नोटिस पाठविली होती व त्यावर त्या बँकेने लेखी उत्तर दिले होते. ह्या प्रकरणातील सत्य व ह्याबाबतचे त्या बँकेने दिलेले उत्तर विचारात घेऊन, रिझर्व बँक ह्या निर्णयाप्रत आली की, ही उल्लंघने सत्य असून त्यासाठी हा दंड लावणे आवश्यक आहे. अजित प्रसाद वृत्तपत्र निवेदन : 2015-2016/834 |
पेज अंतिम अपडेट तारीख: