<font face="mangal" size="3">भारतीय रिजर्व बँकेने तिरुपती अर्बन को-ऑपरेटì - आरबीआय - Reserve Bank of India
भारतीय रिजर्व बँकेने तिरुपती अर्बन को-ऑपरेटीव बँक लिमिटेड, नागपूर (महाराष्ट्र) वर आर्थिक दंड ठोठावला
09 जानेवारी 2023 भारतीय रिजर्व बँकेने तिरुपती अर्बन को-ऑपरेटीव बँक लिमिटेड, नागपूर (महाराष्ट्र) वर आर्थिक दंड ठोठावला भारतीय रिजर्व बँकेने दिनांक ४ जानेवारी २०२३ रोजीच्या आदेशाद्वारे तिरुपती को-ऑपरेटीव बँक लिमिटेड, नागपूर वर भारतीय रिजर्व बँकेने तुमचा ग्राहक जाणा (केवायसी) निर्देश, या संदर्भात जारी केलेल्या निर्देशांचे उल्लंघन/पालन न केल्याबद्दल ₹५०,०००/- (केवळ पन्नास हजार रुपये) चा दंड ठोठावला आहे. उपरोक्त निर्देशांचे पालन करण्यास बँक असमर्थ राहिली ही बाब लक्षात घेता बँकिंग नियमन कायदा, १९४९ च्या कलम ४७ ए (१) (सी) आणि सह वाचलेल्या ४६ (४) (i) व कलम ५६ मध्ये अंतर्भूत असलेल्या तरतुदीनुसार भारतीय रिजर्व बँकेद्वारे आपल्या अधिकाराचा वापर करीत हा दंड ठोठावण्यात आला आहे. ही कृती नियामक अनुपालनातील कमतरतांवर आधारित आहे आणि यामधे बँकेने तिच्या ग्राहकांसोबत केलेल्या कोणत्याही व्यवहाराच्या किंवा कराराच्या वैधतेवर प्रश्न चिन्ह उपस्थित करण्याचा हेतू नाही. पार्श्वभूमी ३१ मार्च २०२१ रोजीच्या आर्थिक स्थितीवर आधारित बँकेच्या जोखीम मुल्यांकन अहवालात, इतर बाबींसह असे दिसून आले कि बँकेने भारतीय रिजर्व बँकेद्वारे जारी उपरोक्त निर्देशांचे उलंघन/पालन न करता आपल्या ग्राहकांच्या केवायसी चे नियमित अद्यतन केले नाही. याच आधारे निर्देशांचे पालन न केल्यामुळे बँकेवर दंड का लादला जाऊ नये याची कारणे दाखवा असे सूचित करणारी नोटीस बँकेला बजावण्यात आली होती. या बाबतीत बँकेने दिलेले उत्तर, वैयक्तिक सुनावणीच्या वेळी बँकेने सादर केलेले तोंडी निवेदन विचारात घेता भारतीय रिजर्व बँक या निष्कर्षावर पोहोचली कि भारतीय रिजर्व बँकेच्या निर्देशांचे पालन न केल्याचे सिद्ध होते आणि आर्थिक दंड लावले जाने आवश्यक आहे. (योगेश दयाल) प्रेस प्रकाशन: 2022-2023/1519 |