RbiSearchHeader

Press escape key to go back

Past Searches

Page
Official Website of Reserve Bank of India

Notification Marquee

RBI Announcements
RBI Announcements

RbiAnnouncementWeb

RBI Announcements
RBI Announcements

Asset Publisher

109744941

भारतीय रिझर्व बँकेने विद्यानंद को-ऑपरेटीव बँक लिमिटेड, सोलापूर (महाराष्ट्र) वर आर्थिक दंड ठोठावला.

भारतीय रिझर्व बँकेने दिनांक 7 डिसेंबर 2023 आदेशाद्वारे विद्यानंद को-ऑपरेटीव बँक लिमिटेड, सोलापूर, महाराष्ट्र (बँक) वर नागरी सहकारी बॅंकांसाठी जारी केलेल्या  प्रकटीकरण मानदंड, वैधानिक व इतर निर्बंध जे प्राथमिक (नागरी) सहकारी बँकांनी अन्य बँकेत ठेवी ठेवण्याबाबत व प्राथमिक (नागरी) सहकारी बँकांनी गुंतवणूक करणे या संदर्भात भारतीय रिझर्व बँकेने जारी केले आहेत, त्या निर्देशांचे पालन न केल्यामुळे 1 लाख (केवळ एक लाख रुपये) चा आर्थिक दंड ठोठावला आहे. बँकिंग नियमन कायदा, 1949 (BR कायदा) कलम 46(4)(i) आणि 56 सह लागू असलेल्या कलम 47A(1)(c) अन्वये भारतीय रिझर्व बँकेला प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून हा दंड ठोठावण्यात आला आहे.

ही कृती नियामक अनुपालनातील कमतरतांवर आधारित आहे आणि यात बँकेने तिच्या ग्राहकांशी केलेल्या कोणत्याही व्यवहाराच्या किंवा कराराच्या वैधतेवर प्रश्न चिन्ह उपस्थित करण्याचा हेतू नाही.

पार्श्वभूमी

31 मार्च 2023 रोजीच्या आर्थिक स्थितीवर आधारित बँकेच्या जोखीम मूल्यांकन तपासणी अहवालात आणि त्या संबंधित सर्व पत्रव्यवहारावरून असे निदर्शनास आले की बँकेने, भारतीय रिझर्व बँकेद्वारे जारी उपरोक्त निर्देशांचे उल्लंघन करुन/पालन न करता धोरणात्मक अंतर बँक ठेवीवर घालण्यात आलेल्या एकंदर मर्यादेचे उल्लंघन केलेले आहे. परिणामी, बँकेला कारण दाखवा नोटीस बजावण्यात आली होती, ज्यामध्ये म्हटल्याप्रमाणे, वरील निर्देशांचे पालन करण्यात अयशस्वी झाल्याबद्दल बँकेला दंड का आकारला जाऊ नये याची कारणे दाखवा अशी विचारणा करण्यात आली होती.

नोटिसला बँकेने दिलेले उत्तर व वैयक्तिक सुनावणीच्या वेळी बँकेने सादर केलेले तोंडी निवेदन विचारात घेता भारतीय रिझर्व बँक या निष्कर्षावर पोहोचली कि भारतीय रिजर्व बँकेच्या निर्देशांचे पालन न केल्याचे सिद्ध होते आणि आर्थिक दंड लावला जाणे आवश्यक आहे.                             

(योगेश दयाल)  
मुख्य महाप्रबंधक

प्रेस प्रकाशनी: 2023-2024/1559

RbiTtsCommonUtility

प्ले हो रहा है
ऐका

Related Assets

RBI-Install-RBI-Content-Global

RbiSocialMediaUtility

भारतीय रिझर्व्ह बँक मोबाईल ॲप्लिकेशन इंस्टॉल करा आणि नवीनतम बातम्यांचा त्वरित ॲक्सेस मिळवा!

आमचे अ‍ॅप इंस्टॉल करण्यासाठी QR कोड स्कॅन करा

RbiWasItHelpfulUtility

पेज अंतिम अपडेट तारीख:

हे पेज उपयुक्त होते का?