RbiSearchHeader

Press escape key to go back

Past Searches

Page
Official Website of Reserve Bank of India

Notification Marquee

RBI Announcements
RBI Announcements

RbiAnnouncementWeb

RBI Announcements
RBI Announcements

Asset Publisher

138912705

भारतीय रिजर्व बँकेने विवा होम फाइनेंस लिमिटेड, पालघर, महाराष्ट्र वर आर्थिक दंड ठोठावला

भारतीय रिजर्व बँकेने 23 ऑक्टोबर 2025 रोजीच्या आदेशाद्वारे विवा होम फाइनेंस लिमिटेड, पालघर, महाराष्ट्र (कंपनी) वर भारतीय रिजर्व बँकेने ‘बिगर-बँकिंग वित्तीय कंपनी - गृहनिर्माण वित्त कंपनी (रिझर्व्ह बँक) निर्देश 2021’ वर जारी केलेल्या काही निर्देशांचे पालन न केल्याबद्दल ₹10,000/- (केवळ दहा हजार रुपये) चा आर्थिक दंड ठोठावला आहे. नॅशनल हाऊसिंग बँक ॲक्ट, 1987 च्या कलम 52A अंतर्गत प्रदान केलेल्या भारतीय रिजर्व बँकेमध्ये निहित अधिकारांचा वापर करून हा दंड ठोठावण्यात आला आहे.

नॅशनल हाऊसिंग बँकद्वारे कंपनीची 31 मार्च 2023 आणि 31 मार्च 2024 रोजीच्या आर्थिक स्थितीच्या संदर्भात वैधानिक तपासणी करण्यात आली होती. वैधानिक तरतुदींचे उल्लंघन झाल्याचे पर्यवेक्षी निष्कर्ष आणि त्या संदर्भात संबंधित पत्रव्यवहार यांवर आधारित, कंपनीला नोटीस बजावण्यात आली होती, ज्यामध्ये म्हटल्याप्रमाणे, वरील निर्देशांचे पालन करण्यात अयशस्वी झाल्याबद्दल कंपनीला दंड का लावला जाऊ नये याची कारणे दाखवा अशी विचारणा करण्यात आली होती. कंपनीने नोटिशीला दिलेले उत्तर आणि वैयक्तिक सुनावणी दरम्यान केलेले तोंडी सादरीकरण यांचा विचार केल्यानंतर, भारतीय रिजर्व बँकेला, आढळले की, कंपनीविरुद्ध पुढील आरोप कायम आहे, ज्यामुळे कंपनीवर आर्थिक दंड आकारला जाणे आवश्यक आहे.

कंपनीने पूर्णवेळ संचालक नियुक्तीसाठी आरबीआयची पूर्व लेखी परवानगी घेतली नव्हती, ज्यामुळे कंपनीच्या स्वतंत्र संचालकांना वगळून ३०% पेक्षा जास्त संचालकांमध्ये बदल झाला.

ही कृती नियामक अनुपालनातील कमतरतांवर आधारित आहे आणि यामधे कंपनीने तिच्या ग्राहकांसोबत केलेल्या कोणत्याही व्यवहाराच्या किंवा कराराच्या वैधतेवर प्रश्न चिन्ह उपस्थित करण्याचा हेतू नाही. याशिवाय, हा आर्थिक दंड लादणे हे कंपनीच्या विरोधात आरबीआयने सुरू केलेल्या इतर कोणत्याही कारवाईचा पूर्वग्रह न ठेवता आहे.

(ब्रिज राज)    
मुख्य महाप्रबंधक

प्रेस प्रकाशनी: 2025-2026/1448

RbiTtsCommonUtility

प्ले हो रहा है
ऐका

Related Assets

RBI-Install-RBI-Content-Global

RbiSocialMediaUtility

भारतीय रिझर्व्ह बँक मोबाईल ॲप्लिकेशन इंस्टॉल करा आणि नवीनतम बातम्यांचा त्वरित ॲक्सेस मिळवा!

आमचे अ‍ॅप इंस्टॉल करण्यासाठी QR कोड स्कॅन करा

RbiWasItHelpfulUtility

पेज अंतिम अपडेट तारीख:

हे पेज उपयुक्त होते का?