<font face="mangal" size="3">भारतीय रिझर्व बँकेने व्यापारी सहकारी बँक मर - आरबीआय - Reserve Bank of India
भारतीय रिझर्व बँकेने व्यापारी सहकारी बँक मर्यादित, सोलापूर (महाराष्ट्र) वर आर्थिक दंड ठोठावला
27 मार्च, 2023 भारतीय रिझर्व बँकेने व्यापारी सहकारी बँक मर्यादित, सोलापूर (महाराष्ट्र) वर आर्थिक दंड ठोठावला भारतीय रिझर्व बँके ने दिनांक २४ मार्च २०२३ रोजीच्या आदेशान्वये व्यापारी सहकारी बँक मर्यादित, सोलापूर वर, भारतीय रिझर्व बँके द्वारा शहरी सहकारी बँकां साठी लागू करण्यात आलेल्या प्रकटीकरण संबंधी निकषांचे आणि/अथवा शहरी सहकारी बँक आणि शहरी सहकारी बँकांचे निदेशक मंडळ यांच्या संदर्भात शहरी सहकारी बँकांवर लादण्यात आलेल्या वैधानिक/अन्य प्रतिबंधांचे उल्लंघन केल्या बद्दल/त्यांचे पालन न केल्याबद्दल ₹२.०० लाख रुपयांचा (केवळ रुपये दोन लाख) दंड ठोठावला आहे. भारतीय रिझर्व्ह बँके द्वारा लादण्यात आलेल्या उपरोक्त निर्देशांचे पालन करण्यास बँक असमर्थ होती ही बाब लक्षात घेता बँकिंग नियमन कायदा १९४९ च्या कलम ४७ ए(१)(सी) व ४६ (४)(i) आणि कलम ५६ मधील तरतुदींनुसार भारतीय रिझर्व बँके द्वारे आपल्या अधिकारांचा वापर करीत हा दंड ठोठावण्यात आला आहे. ही कृती नियामक अनुपालनामधील कमतरतांवर आधारित आहे आणि यामध्ये बँकेने तिच्या ग्राहकांसोबत केलेल्या कोणत्याही व्यवहाराच्या किंवा कराराच्या वैधतेवर प्रश्न चिन्ह उपस्थित करण्याचा हेतू नाही. पार्श्वभूमी वरील बँकेच्या ३१ मार्च २०२१ रोजीच्या आर्थिक स्थितीवर आधारित निरीक्षण अहवालात इतर बाबींसह असे ही दिसून आले की (i) वरील बँके ने आपल्या विहित मर्यादेपेक्षा अधिक रकमेच्या देणग्या दिलेल्या आहेत. आणि (ii) बँकेच्या निर्देशकांशी संबंधित असलेल्यांना कर्ज देण्यासंबंधात भारतीय रिझर्व्ह बँके द्वारा जारी करण्यात आलेल्या निर्देशांचे उल्लंघन केले आहे / त्यांचे पालन केलेले नाही. याच आधारे निर्देशांचे पालन न केल्यामुळे बँके वर दंड का लादला जाऊ नये याची कारणे दाखवा असे सूचित करणारी नोटिस बँकेला बजावण्यात आली होती. या बाबतीत बँकेने दिलेले उत्तर, वैयक्तिक सुनावणीच्या वेळी बँकेने सादर केलेले तोंडी निवेदन विचारात घेता भारतीय रिझर्व बँक या निष्कर्षावर पोहोचली की भारतीय रिझर्व बँकेच्या निर्देशांचे पालन न केल्याचे सिद्ध होते आणि आर्थिक दंड लावले जाणे आवश्यक आहे. (योगेश दयाल) प्रेस प्रकाशनी: 2022-2023/1924 |