यशवंत नागरी सहकारी बँक लि., लातुर, (महाराष्ट्र) ह्यांचेवर आरबीआयकडून दंड लागु
मे 16, 2017 यशवंत नागरी सहकारी बँक लि., लातुर, (महाराष्ट्र) ह्यांचेवर आरबीआयकडून दंड लागु बँकिंग विनियामक अधिनियम 1949 च्या (सहकारी सोसायट्यांना लागु असलेला) कलम 46(4) सह वाचित कलम 47 अ(1)(ब) खाली तिला देण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करुन, भारतीय रिझर्व बँकेने, यशवंत नागरी सहकारी बँक लि., लातुर (महाराष्ट्र) ह्यांचेवर, तुमचा ग्राहक जाणा बाबत आरबीआयने दिलेल्या सूचनांचे उल्लंघन केल्याबद्दल, रु.1.00 लाख (रुपये एक लाख) दंड लावला आहे. भारतीय रिझर्व बँकेने वरील बँकेला एक कारणे दाखवा नोटिस पाठविली होती. त्यावर त्या बँकेने लेखी उत्तरही सादर केले होते. ह्या प्रकरणातील सत्य व बँकेने दिलेले उत्तर विचारात घेऊन रिझर्व बँकेने निष्कर्ष काढला की, उल्लंघने झाली असून त्याबाबत दंड लावणे आवश्यक आहे. अजित प्रसाद वृत्तपत्र निवेदन : 2016-2017/3082 |
पेज अंतिम अपडेट तारीख: