<font face="mangal" size="3">दि सिकंदराबाद को-ऑपरेटिव अर्बन बँक लि., हैद्रा&# - आरबीआय - Reserve Bank of India
दि सिकंदराबाद को-ऑपरेटिव अर्बन बँक लि., हैद्राबाद, तेलंगणा ह्यांना आरबीआयकडून दंड लागु
जून 8, 2018 दि सिकंदराबाद को-ऑपरेटिव अर्बन बँक लि., हैद्राबाद, तेलंगणा ह्यांना आरबीआयकडून दंड लागु बँकिंग विनियामक अधिनियम 1949 च्या (सहकारी सोसायट्यांना लागु असलेला) कलम 46(2) व (4) सह वाचित कलम 47अ(1)(अ) व (क) खाली तिला देण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करुन भारतीय रिझर्व बँकेने, दि सिकंदराबाद को-ऑपरेटिव अर्बन बँक लि., हैद्राबाद, तेलंगणा ह्यांना रु.2,50,000/- (रुपये दोन लाख पन्नास हजार) दंड लावला आहे. हा दंड ऑटोमेटेड टेलर मशीन्स (एटीएम), सुधारित सुपरवायजरी अॅक्शन फ्रेमवर्क (एसएएफ) खाली वरील बँकेवर घातलेले निर्बंध, एक्सपोझर नॉर्म्स, ह्याबाबत आरबीआयने दिलेल्या सूचना/मार्गदर्शक तत्वांचे उल्लंघन व भारतीय रिझर्व बँकेला खोटी माहिती देणे आणि तपासणी दरम्यान संबंधित रेकॉर्ड्स उपलब्ध न केल्याबद्दल लावण्यात आला आहे. भारतीय रिझर्व बँकेने वरील बँकेला एक कारणे दाखवा नोटिस पाठविली होती व त्यावर वरील बँकेने तिचे लेखी उत्तर सादर केले होते. ह्या प्रकरणातील सत्य व बँकेने दिलेले उत्तर विचारात घेऊन, रिझर्व बँकेने निष्कर्ष काढला की, उल्लंघने झाल्याचे सिध्द होत असून त्यासाठी दंड लावणे आवश्यक आहे. अजित प्रसाद वृत्तपत्र निवेदन : 2017-2018/3224 |