<font face="mangal" size="3">बाँबे मर्कंटाईल सहकारी बँक लि. मुंबई ह्यांना  - आरबीआय - Reserve Bank of India
बाँबे मर्कंटाईल सहकारी बँक लि. मुंबई ह्यांना आरबीआयकडून दंड लागु
जानेवारी 19, 2017 बाँबे मर्कंटाईल सहकारी बँक लि. मुंबई ह्यांना आरबीआयकडून दंड लागु बँकिंग विनियात्मक अधिनियम, 1949 (सहकारी सोसायट्यांना लागु असलेला) च्या कलम 46 (4) सह वाचित, कलम 47ए(1) च्या तरतुदींखाली तिला देण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करुन, भारतीय रिझर्व बँकेने बाँबे मर्कंटाईल सहकारी बँक लि., मुंबई ह्यांना, रु.75.00 लाख (रुपये पंचाहत्तर लाख) दंड ठोठावला आहे, आणि हा दंड, तुमचा ग्राहक जाणा/अँटी मनी लाँडरिंग (केवायसी/एएमएल) बाबत रिझर्व बँकेने दिलेल्या निदेशांचे उल्लंघन केल्याबद्दल लावण्यात आला आहे. भारतीय रिझर्व बँकेने ह्याबाबत वरील बँकेला एक कारणे दाखवा नोटिस पाठविली होती. त्यावर वरील बँकेने लेखी उत्तर सादर केले होते आणि त्यावर तोंडी खुलासेही केले होते. ह्या प्रकरणातील सत्य गोष्टी व बँकेने दिलेले उत्तर विचारात घेतल्यावर रिझर्व बँकेने निष्कर्ष काढला की उल्लंघनांना पुष्टि मिळत असून त्यासाठी दंड लावणे आवश्यक आहे. अजित प्रसाद वृत्तपत्र निवेदन : 2016-2017/1940 |