<font face="mangal" size="3">क्रेडिट अॅग्रिकोल कॉर्पोरेट अँड इनवेस्टमें - आरबीआय - Reserve Bank of India
क्रेडिट अॅग्रिकोल कॉर्पोरेट अँड इनवेस्टमेंट बँक (इंडिया) ह्यांचेवर आरबीआय द्वारा दंड लागु
ऑक्टोबर 20, 2016 क्रेडिट अॅग्रिकोल कॉर्पोरेट अँड इनवेस्टमेंट बँक (इंडिया) बँकिंग विनियामक अधिनियम 1949 च्या कलम 46 (4)(1) सह वाचित, कलम 47 (अ)(1)(क) खाली तिला मिळालेल्या अधिकारांचा वापर करुन, रिझर्व बँकेने, क्रेडिट अॅग्रीकोल कॉर्पोरेट अँड इनवेस्टमेंट बँक (इंडिया) ह्यांना, बँकिंग विनियामक अधिनियम 1949 च्या कलम 6 च्या तरतुदीचे उल्लंघन केल्यासाठी रु. 10 दशलक्ष (रुपये दहा दशलक्ष) दंड लागु केला आहे. ही बँक तिच्या, क्रेडिट अॅग्रीकोल सीआयबी सर्व्हिसेस प्रा. लि. ह्या आऊटसोर्सिंग एजन्सीला अनेक सेवा देऊन तिच्याकडून शुल्क मिळवत होती. बँकिंग विनियामक अधिनियम, 1949 च्या कलम 6(1) खाली ह्या कार्यकृतींना परवानगी नसल्याने वरील बँकेला, बँकिंग विनियामक अधिनियम 1949 च्या कलम 6 चे उल्लंघन केले असल्याची एक कारणे दाखवा नोटिस पाठविण्यात आली होती. बँकेने दिलेले उत्तर व्यक्तिगत सादरीकरणे व रेकॉर्डवर उपलब्ध असलेले कागदपत्र विचारात घेतल्यानंतर रिझर्व बँकेने निष्कर्ष काढला की उल्लंघन सिध्द झाले असून दंड लावणे आवश्यक आहे. अजित प्रसाद वृत्तपत्र निवेदन : 2016-2017/979 |