<font face="mangal" size="3px">इको इंडिया फायनान्शियल सर्व्हिसेस प्रा. लिम&# - आरबीआय - Reserve Bank of India
इको इंडिया फायनान्शियल सर्व्हिसेस प्रा. लिमिटेड ह्यांचेवर आरबीआयकडून दंड लागु
मार्च 21, 2017 इको इंडिया फायनान्शियल सर्व्हिसेस प्रा. लिमिटेड ह्यांचेवर आरबीआयकडून दंड लागु पीएसएस अधिनियम 2007 च्या कलम 30 च्या तरतुदींनी दिलेल्या अधिकारांचा वापर करुन, भारतीय रिझर्व बँकेने (आरबीआय), इको इंडिया फायनान्शियल सर्व्हिसेस प्रा. लि. (संस्था) ह्यांना रु.5,00,000/- (रुपये पाच लाख) दंड लागु केला आहे. हा दंड आरबीआयच्या सूचनांचे पालन न केल्याने व चुकीचे अहवाल देण्याबाबत लावण्यात आला आहे. भारतीय रिझर्व बँकेने, अहवालांची छाननी केल्यावर ह्या संस्थेला आधी एक कारणे दाखवा नोटिस पाठविली होती. त्यावर वरील संस्थेने लेखी उत्तर सादर केले होते. ह्या प्रकरणातील सत्य व ह्या बँकेने दिलेले उत्तर विचारात घेता, रिझर्व बँकेने निष्कर्ष काढला की, उल्लंघने झाली असून त्यासाठी दंड लावणे आवश्यक आहे. अनिरुध्द डी जाधव वृत्तपत्र निवेदन : 2016-2017/2516 |