<font face="mangal" size="3px">हरिहरेश्वर सहकारी बँक लि., वाई, जिल्हा सातारा ì - आरबीआय - Reserve Bank of India
हरिहरेश्वर सहकारी बँक लि., वाई, जिल्हा सातारा ह्यांचेवर आरबीआयकडून दंड लागु
मार्च 21, 2017 हरिहरेश्वर सहकारी बँक लि., वाई, जिल्हा सातारा ह्यांचेवर आरबीआयकडून दंड लागु बँकिंग विनियामक अधिनियम, 1949 च्या (सहकारी सोसायट्यांना लागु असलेला) कलम 46 (4) सह वाचित कलम 47 अ (1) ने दिलेल्या अधिकाराचा वापर करुन, भारतीय रिझर्व बँकेने हरिहरेश्वर सहकारी बँक लि. वाई, जिल्हा सातारा ह्यांना, रु.2.00 लाख (रुपये दोन लाख) दंड लागु केला आहे. हा दंड, संचालकांच्या मालकीच्या मालमत्तांविरुध्द कर्जे देण्याबाबत, बी आर अधिनियम 1949(एएसीएस) च्या कलम 20 मधील तरतुदींचे उल्लंघन करण्याबाबत लावण्यात आला आहे. रिझर्व बँकेने वरील बँकेला एक कारणे दाखवा नोटिस पाठविली होती. त्यावर वरील बँकेने लेखी उत्तर व तोंडी जबाब सादर केला होता. ह्या प्रकरणातील सत्य व ह्या बँकेने दिलेले उत्तर विचारात घेता, रिझर्व बँकेने निष्कर्ष काढला की, उल्लंघने झाली असून त्यासाठी दंड लावणे आवश्यक आहे. अनिरुध्द डी जाधव वृत्तपत्र निवेदन : 2016-2017/2515 |