<font face="mangal" size="3">जळगाव डिस्ट्रिक्ट सहकारी बँक लि., जळगाव, महारा& - आरबीआय - Reserve Bank of India
जळगाव डिस्ट्रिक्ट सहकारी बँक लि., जळगाव, महाराष्ट्र ह्यांना आरबीआयकडून दंड लागु
मे 12, 2016 जळगाव डिस्ट्रिक्ट सहकारी बँक लि., जळगाव, महाराष्ट्र बँकिंग विनियामक अधिनियम 1949 (सहकारी सोसायट्यांना लागु असलेला) च्या कलम 46(4) सह वाचित कलम 47अ(1)(ब) अन्वये तिला मिळालेल्या अधिकाराचा वापर करुन भारतीय रिझर्व बँकेने, जळगाव डिस्ट्रिक्ट सहकारी बँक लि., जळगाव, महाराष्ट्र ह्यांना, रु.2.00 लाख (रुपये दोन लाख) दंड लावला असून तो दंड, वरील बँकेचे त्यावेळी असलेल्या संचालकांचे हितसंबंध असलेल्या, जळगाव स्टार्च फॅक्टरीला बँकेला येणे असलेल्या कर्जांवर सूट देण्याबाबत, आरबीआयची पूर्व परवानगी न घेता, बी आर अधिनियमाच्या कलम 20अ चे उल्लंघन केल्याबाबत लावण्यात आला आहे. ह्याबाबत रिझर्व बँकेने दिलेल्या कारणे दाखवा नोटिसीला वरील बँकेने लेखी उत्तर दिले. ह्या प्रकरणातील सत्य गोष्टी व वरील बँकेने दिलेले उत्तर विचारात घेता, बँकेने निर्णय घेतला की उल्लंघन सिध्द झाले असून त्याबाबत दंड होणे आवश्यक आहे. अजित प्रसाद वृत्तपत्र निवेदन : 2015-2016/2645 |