कौजलगी अर्बन को ऑपरेटिव क्रेडिट बँक लि., कौजलगी, कर्नाटक ह्यांचेवर आरबीआयकडून दंड लागु
फेब्रुवारी 27, 2017 कौजलगी अर्बन को ऑपरेटिव क्रेडिट बँक लि., कौजलगी, कर्नाटक ह्यांचेवर आरबीआयकडून दंड लागु बँकिंग विनियामक अधिनियम, 1949 च्या (सरकारी सोसायट्यांना लागु असलेला) कलम 46(4) सह वाचित, कलम 47अ(1)(ब) च्या तरतुदींखाली तिला देण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करुन, भारतीय रिझर्व बँकेने, कौजलगी अर्बन को ऑपरेटिव क्रेडिट बँक लि., कौजलगी, कर्नाटक, ह्यांना रु.1.00 लाख (रुपये एक लाख) दंड लागु केला आहे. हा दंड, ‘ठेवीदार शिक्षण व जाणीव निधी योजना, 2014’ बाबत रिझर्व बँकेने दिलेल्या सूचना/मार्गदर्शक तत्वांचे उल्लंघन आणि आरबीआयने, तुमचा ग्राहक जाणा/अँटी मनी लाँडरिंग (केवायसी/एएमएल) बाबत दिलेल्या निदेशांची उल्लंघने केल्यासाठी लावण्यात आला आहे. भारतीय रिझर्व बँकेने, वरील बँकेला, कारणे दाखवा नोटिस पाठविली होती आणि त्यावर वरील बँकेने सूचनांचे अनुपालन करण्यासाठी मुदतवाढ मागितली होती. दोन वेळा मुदतवाढ देऊनही, वरील बँकेने अनुपालन केल्याचे सादर केले नाही आणि वैय्यक्तिक सुनावणीची मागणीही केली नाही. ह्या प्रकरणातील सत्य आणि ह्याबाबत वरील बँकेने न दिलेले उत्तर विचारात घेऊन, रिझर्व बँकेने निष्कर्ष काढला की, वरील उल्लंघनांना पुष्टी मिळत असून त्यासाठी दंड लावणे आवश्यक आहे. अजित प्रसाद वृत्तपत्र निवेदन : 2016-2017/2293 |
पेज अंतिम अपडेट तारीख: