<font face="mangal" size="3">मुंबई जिल्हा केंद्रीय सहकारी बँक लि., मुंबई, मह& - आरबीआय - Reserve Bank of India
मुंबई जिल्हा केंद्रीय सहकारी बँक लि., मुंबई, महाराष्ट्र ह्यांना आरबीआयकडून दंड लागु
जानेवारी 03, 2017 मुंबई जिल्हा केंद्रीय सहकारी बँक लि., मुंबई, महाराष्ट्र ह्यांना आरबीआयकडून दंड लागु बँकिंग विनियामक अधिनियम, 1949 च्या (सहकारी सोसायट्यांना लागु असलेला) कलम 46(4) सह वाचित, कलम 47अ(1)(ब) च्या तरतुदीनुसार तिला देण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करुन, मुंबई जिल्हा केंद्रीय सहकारी बँक लि., मुंबई, महाराष्ट्र ह्यांना रु.1 लाख (रु. एक लाख फक्त) दंड लागु केला असून, हा दंड, तुमचा ग्राहक जाणा (केवायसी) निकष/अँटी मनीलाँडरिंग मेजर्स (एएमएल) ह्याबाबत रिझर्व बँकेने दिलेल्या निदेशांचे/मार्गदर्शक तत्वांचे/सूचनांचे पालन न केल्याबाबत लावण्यात आला आहे. भारतीय रिझर्व बँकेने वरील बँकेला एक कारणे दाखवा नोटिस दिली होती. त्याबाबत वरील बँकेने तिचे लेखी उत्तर व मौखिक सादरीकरणही दिले होते. ह्या प्रकरणातील सत्य आणि बँकेने दिलेले उत्तर ह्यांचा विचार केल्यानंतर रिझर्व बँकेने निष्कर्ष काढला की उल्लंघने झाली आणि त्यासाठी दंड लावणे आवश्यक आहे. अजित प्रसाद वृत्तपत्र निवेदन : 2016-2017/1748 |