<font face="mangal" size="3">शिवम सहकारी बँक लि., कोल्हापुर ह्यांचेवर आरबी& - आरबीआय - Reserve Bank of India
शिवम सहकारी बँक लि., कोल्हापुर ह्यांचेवर आरबीआयकडून दंड लागु
सप्टेंबर 26, 2016 शिवम सहकारी बँक लि., कोल्हापुर ह्यांचेवर आरबीआयकडून दंड लागु बँकिंग विनियम अधिनियम, 1949 (सहकारी सोसायट्यांना लागु असलेला) च्या कलम 46(4) सह वाचित कलम 47अ(1)(ब) ने तिला दिलेल्या अधिकाराचा वापर करुन भारतीय रिझर्व बँकेने, शिवम सहकारी बँक लि., कोल्हापुर ह्यांना रु.2.00 लाख (रुपये दोन लाख) दंड लावला असून, तो दंड, कारभाराचे क्षेत्र व तुमचा ग्राहक जाणा (केवायसी)/अँटीमनी लॉडरिंग (एएमएल) बाबत रिझर्व बँकेने दिलेल्या मार्गदर्शक तत्वांचे उल्लंघन केल्याने लावण्यात आला आहे. रिझर्व बँकेने वरील बँकेला एक कारणे दाखवा नोटिस पाठविली होती त्यावर त्या बँकेने लेखी उत्तर देऊन तोंडी सादरीकरणही केले होते. ह्या प्रकरणातील सत्यता व बँकेने दिलेले उत्तर विचारात घेऊन, रिझर्व बँकेने निष्कर्ष काढला की वरील उल्लंघने सिध्द झाली असून त्यासाठी दंड लावणे आवश्यक आहे. अजित प्रसाद वृत्तपत्र निवेदन : 2016-2017/770 |