<font face="mangal" size="3">श्री दादासाहेब गजमल सहकारी बँक लि, पाचोरा, जिल&# - आरबीआय - Reserve Bank of India
श्री दादासाहेब गजमल सहकारी बँक लि, पाचोरा, जिल्हा : जळगाव ह्यांना आरबीआयकडून दंड आकारणी
ऑगस्ट 16, 2016 श्री दादासाहेब गजमल सहकारी बँक लि, पाचोरा, जिल्हा : जळगाव बँकिंग विनियम अधिनियम 1949 च्या (सहकारी सोसायट्यांना लागु असलेला) कलम 46 (4) सह वाचित कलम 47 अ(1)(ब) खाली दिलेल्या अधिकारांचा वापर करुन भारतीय रिझर्व बँकेने, श्री दादासाहेब गजमल सहकारी बँक लि., पाचोरा, जिल्हा जळगाव ह्यांना रु.1.00 लाख (रुपये एक लाख) दंड लावला आहे. आणि हा दंड, रिझर्व बँकेची पूर्व मंजुरी न घेता, बँकेच्या अॅसेट्सवर फ्लोटिंग चार्ज निर्माण करण्याबाबत आरबीआयने दिलेल्या सूचना/मार्गदर्शक तत्वे ह्यांचे उल्लंघन केल्याबाबत लावण्यात आला आहे. रिझर्व बँकेने वरील बँकेला एक कारणे दाखवा नोटिस पाठविली होती व त्यावर त्या बँकेने लेखी उत्तर देऊन मौखिक सादरीकरणही केले होते. ह्या प्रकरणातील सत्य व बँकेने दिलेले उत्तर विचारात घेऊन रिझर्व बँक ह्या निष्कर्षावर आली की उल्लंघने निश्चितपणे झाली असून दंड लावणे आवश्यक आहे. अजित प्रसाद वृत्तपत्र निवेदन : 2016-2017/419 |