<font face="mangal" size="3">देवी गायत्री सहकारी अर्बन बँक लि., हैद्राबाद, त& - आरबीआय - Reserve Bank of India
देवी गायत्री सहकारी अर्बन बँक लि., हैद्राबाद, तेलंगणा ह्यांचेवर आरबीआयकडून दंड लागु
ऑक्टोबर 28, 2016 देवी गायत्री सहकारी अर्बन बँक लि., हैद्राबाद, तेलंगणा ह्यांचेवर आरबीआयकडून दंड लागु बँकिंग विनियामक अधिनियम 1949 च्या (सहकारी सोसायट्यांना लागु असणारा) कलम 46(4) सह वाचित, कलम 47 अ(1)(ब) ने तिला देण्यात येणा-या अधिकारांचा वापर करुन, भारतीय रिझर्व बँकेने, देवी गायत्री सहकारी अर्बन बँक लि., हैद्राबाद, तेलंगणा ह्यांना, संचालक व त्यांचे नातेवाईक ह्यांना कर्जे व अग्रिम राशी देण्याबाबत रिझर्व बँकेने दिलेले निदेशांचे व मार्गदर्शक तत्वांचे उल्लंघन केल्याबाबत, रु. 1.00 लाख (रुपये एक लाख) दंड लावला आहे. रिझर्व बँकेने वरील बँकेला एक कारणे दाखवा नोटिस पाठविली होती व त्यावर त्या बँकेने लेखी उत्तर दिले होते. ह्या प्रकरणातील सत्य व बँकेने दिलेले उत्तर विचारात घेऊन, भारतीय रिझर्व बँकेने निष्कर्ष काढला की उल्लंघने सिध्द झाली असून त्यासाठी दंड लावणे आवश्यक आहे. अजित प्रसाद वृत्तपत्र निवेदन : 2016-2017/1062 |