दि हारिज नागरी सहकारी बँक लि., हारिज, जिल्हा - पाटण (गुजराथ) ह्यांच्यावर आरबीआयकडून दंड आकारणी
मार्च 31, 2016 दि हारिज नागरी सहकारी बँक लि., हारिज, जिल्हा - पाटण (गुजराथ) ह्यांच्यावर आरबीआयकडून दंड आकारणी बँकिंग विनियामक अधिनियम 1949 (सहकारी सोसायट्यांना लागु असलेला) च्या कलम 46 (4) सह वाचित कलम 47 अ (1)(ब) ने तिला दिलेल्या अधिकाराचा वापर करुन रिझर्व बँकेने, हारिज नागरी सहकारी बँक लि., हारिज, जिल्हा पाटण (गुजराथ) ह्यांना रु.3.0 लाख (रुपये तीन लाख फक्त) दंड लावला आहे. हा दंड, बी आर अधिनियम 1949 (एएसीएस) च्या कलम 36(1) खाली आरबीआयने दिलेल्या निरनिराळ्या कार्यकारी सूचना, आणि बुलेट पुनर्प्रदान पर्यायासह सुवर्ण कर्जासाठी आरबीआयने दिलेली मार्गदर्शक तत्वे, ग्राहकांना युनिक कस्टमर आयडेंटिफिकेशन कोड (युसीआयसी) देण्याबाबत केवायसी/एएमएल मार्गदर्शक तत्वे ह्यांचे उल्लंघन केल्याने लावण्यात आला आहे. 31.3.2015 रोजीच्या आर्थिक स्थितीच्या तपासणीत आढळून आल्यानुसार, भारतीय रिझर्व बँकेने वरील बँकेला एक कारणे दाखवा नोटिस पाठविली होती. त्यावर त्या बँकेने एक लेखी उत्तर पाठवून, अहमदाबाद येथील आरबीआयचे प्रादेशिक संचालक ह्यांच्या अध्यक्षतेखालील वरिष्ठ अधिका-यांच्या समिती (सीएसओ) समोर व्यक्तिगत सादरीकरण केले होते. ह्या प्रकरणातील सूक्ष्म बाबी आणि बँकेने दिलेले उत्तर विचारात घेतल्यानंतर रिझर्व बँक ह्या निर्णयाप्रत आली की वरील उल्लंघने सिध्द झाली असून त्याबाबत दंड लावणे आवश्यक आहे. अजित प्रसाद वृत्तपत्र निवेदन : 2015-2016/2312 |
पेज अंतिम अपडेट तारीख: