<font face="mangal" size="3">नीड्स ऑफ लाईफ कोऑपरेटिव बँक लि. मुंबई ह्यांना & - आरबीआय - Reserve Bank of India
नीड्स ऑफ लाईफ कोऑपरेटिव बँक लि. मुंबई ह्यांना आरबीआयकडून आर्थिक दंड लागु
ऑक्टोबर 10, 2017 नीड्स ऑफ लाईफ कोऑपरेटिव बँक लि. मुंबई ह्यांना आरबीआयकडून आर्थिक दंड लागु बँकिंग विनियामक अधिनियम 1949 च्या (सहकारी सोसायट्यांना लागु असलेला) कलम 46 (4) सह वाचित कलम 47 अ (1) (ब) ने तिला दिलेल्या अधिकारांचा वापर करुन, भारतीय रिझर्व बँकेने, दि नीड्स ऑफ लाईफ कोऑपरेटिव बँक लि., फोर्ट, मुंबई ह्यांना रु.5.00 लाख (रुपये पाच लाख) दंड लागु केला असून, हा दंड, संचालक व त्यांच्या नातेवाईकांना दिलेली कर्जे व अग्रिम राशी ह्यावरील आरबीआयने दिलेल्या मार्गदर्शक तत्वांचे/निदेशांचे उल्लंघन केल्यामुळे, तसेच अप्रतिभूतित ओव्हरड्राफ्ट सुविधा देऊन संस्थांमध्ये असलेले हितसंबंध, वरील बँकेने दिलेली देणगी, भरणा भांडवलाच्या 5% ह्या वैय्यक्तिक भागधारणाचा भंग केल्याबाबत, रियल इस्टेट, कमर्शियल रियल इस्टेट व गृहनिर्माण कर्ज ह्याबाबतच्या एक्सपोझर मर्यादांचा भंग केल्याबाबत, 10% ह्या आऊटस्टँडिंग अप्रतिभूतित एक्सपोझर मर्यादेचा भंग, रु.2.00 लाख ह्या वैय्यक्तिक अप्रतिभूतित एक्सपोझरचा केलेला भंग, आणि ठेवीदार शिक्षण व जाणीव निधीमध्ये निधी जमा न केल्याबाबत करण्यात आला आहे. भारतीय रिझर्व बँकेने वरील बँकेला एक कारणे दाखवा नोटिस पाठविली होती व त्यावर वरील बँकेने लेखी उत्तर सादर केले होते. सप्टेंबर 4, 2017 रोजीच्या वैय्यक्तिक सुनावणीस वरील बँक हजर राहिली नाही. ह्या प्रकरणातील सत्य व बँकेने दिलेले उत्तर विचारात घेऊन रिझर्व बँकेने निष्कर्ष काढला की उल्लंघने झाली असून त्यासाठी दंड लावणे आवश्यक आहे. अजित प्रसाद वृत्तपत्र निवेदन : 2017-2018/981 |