<font face="mangal" size="3">दि युनायटेड को-ऑपरेटिव बँक लि., बागनान स्टेशन र& - आरबीआय - Reserve Bank of India
दि युनायटेड को-ऑपरेटिव बँक लि., बागनान स्टेशन रोड (उत्तर) पो.ऑ. बागनान, जिल्हा - हावडा, पश्चिम बंगाल ह्यांचेवर आरबीआयकडून दंड लागु
मे 16, 2018 दि युनायटेड को-ऑपरेटिव बँक लि., बागनान स्टेशन रोड (उत्तर) पो.ऑ. बागनान, जिल्हा - हावडा, पश्चिम बंगाल ह्यांचेवर आरबीआयकडून दंड लागु बँकिंग विनियामक अधिनियम 1949 च्या (सहकारी सोसायट्यांना लागु असलेला), कलम 46(2) व (4) सह वाचित, कलम 47अ(1)(अ) व (क) खाली तिला देण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करुन भारतीय रिझर्व बँकेने एप्रिल 19, 2018 रोजी, युनायटेड को-ऑपरेटिव बँक लि., बागनान स्टेशन रोड (नॉर्थ) पो.ऑ. बागनान, जिल्हा - हावडा, पश्चिम बंगाल ह्यांचेवर रु.5.00 लाख (रुपये पाच लाख) दंड लागु केला आहे. आणि तो दंड, पुढील बाबींच्या उल्लंघनांसाठी/पालन न करण्यासाठी लावण्यात आला आहे. (अ) कार्यकृती करण्याचे क्षेत्र, शाखा प्राधिकरण धोरण, विस्तारित काऊंटर्स, एटीएम्स सुरु करणे/वाढविणे, कार्यालये हलविणे/विभाजन करणे/बंद करणे ह्यावरील, जुलै 1, 2015 रोजीच्या महापरिपत्रकात दिलेले आरबीआयचे निर्देश/मार्गदर्शक तत्वे आणि (ब) बँकिंग विनियामक अधिनियम 1949 चे (एएसीएस) कलम 35 (2) मार्च 31, 2016 रोजी असलेल्या स्थितीबाबतच्या तपासणीत आढळून आलेल्या बाबींवर आधारित रिझर्व बँकेने वरील बँकेला एक कारणे दाखवा नोटिस पाठविली होती व वरील बँकेने त्यावर लेखी उत्तर दिले होते आणि आरबीआय कोलकाता ह्यांच्या प्रादेशिक संचालकांखालील वरिष्ठ अधिका-यांच्या समितीसमोर वैय्यक्तिक सुनावणीही केली होती. ह्या प्रकरणातील सत्य, बँकेने दिलेले उत्तर व त्याबाबत, वरिष्ठ अधिका-यांना दिलेली मौखिक सादरीकरणे ह्यांना विचारात घेऊन रिझर्व बँकेने निष्कर्ष काढला की उल्लंघनांचे वरील दावे सिध्द होत असून त्यासाठी दंड लावणे आवश्यक आहे. अजित प्रसाद वृत्तपत्र निवेदन : 2017-2018/3013 |