<font face="mangal" size="3">आरबीआयकडून, महात्मा गांधी (नवी) मालिकेमधील रु. - आरबीआय - Reserve Bank of India
आरबीआयकडून, महात्मा गांधी (नवी) मालिकेमधील रु. 10 ची बँक नोट प्रसृत
जानेवारी 5, 2018 आरबीआयकडून, महात्मा गांधी (नवी) मालिकेमधील रु. 10 ची बँक नोट प्रसृत भारतीय रिझर्व बँक लवकरच, भारतीय रिझर्व बँकेचे गव्हर्नर डॉ. उर्जित आर पटेल ह्यांची सही असलेली, महात्मा गांधी (नवी) मालिकेतील रु.10 ची बँक नोट प्रसृत करणार आहे. ह्या नोटेच्या मागील बाजूवर, देशाचा सांस्कृतिक वारसा दर्शविणारे कोणार्क येथील सूर्य मंदिराचे चिन्ह असेल. ह्या नोटेचा पार्श्व रंग चॉकलेटी ब्राऊन असेल. ह्या नोटेच्या दर्शनी तसेच मागच्याही बाजूवर, सर्वकंष रंगसंगतीशी मेळ असणारी इतर डिझाइन्स व भौमितीक आकृती असतील. रिझर्व बँकेने ह्यापूर्वी दिलेल्या मालिकांमधील रु.10 च्या सर्व बँक नोटा, वैध चलन असणे सुरुच राहील. महात्मा गांधी (नवीन) मालिकेतील रु.10 च्या बँक नोटांची प्रतिमा व प्रमुख लक्षणे खाली दिल्यानुसार आहेत. (1) प्रतिमा ![]() ![]() (2) प्रमुख लक्षणे पुढील (दर्शनी) बाजू (1) 10 हे मूल्य दर्शविणा-या अंकासह सी-थ्रु रजिस्टर पार्श्व (मागील) बाजू (10) नोटेच्या छपाईचे वर्ष डाव्या बाजूस. ह्या नोटेचा आकार 63 मिमी X 123 मिमी असेल. जोस जे कत्तूर वृत्तपत्र निवेदन : 2017-2018/1848 |