<font face="mangal" size="3">आरबीआयकडून रु.20 ची महात्मा गांधी मालिकेतील (नव - आरबीआय - Reserve Bank of India
आरबीआयकडून रु.20 ची महात्मा गांधी मालिकेतील (नवीन) बँक नोट वितरित
एप्रिल 26, 2019 आरबीआयकडून रु.20 ची महात्मा गांधी मालिकेतील (नवीन) बँक नोट वितरित भारतीय रिझर्व्ह बँक, लवकरच रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर श्री. शक्तिकांत दास ह्यांची सही असलेली, महात्मा गांधी मालिकेतील (नवीन) रु.20 मूल्याची बँक नोट प्रसृत करणार आहे. देशाचा सांस्कृतिक वारसाअसलेल्या एलोरा गुंफांचे चित्र नवीन नोटेच्या मागील भागावर छापलेले आहे. ह्या नोटेचा बेस कलर हिरवट-पिवळा आहे. नोटेच्या दर्शनी तसेच मागील बाजूवर, ह्या नोटेच्या सर्वंकष रंग योजनेचा अनुरुप अशी इतर डिझाईन्स व भौमितिक आकृती आहेत. रिझर्व्ह बँकेने ह्या पूर्वीच्या मालिकांमध्ये दिलेल्या रु.20 मूल्याच्या बँक नोटा वैध चलन असणे सुरुच राहील. महात्मा गांधी मालिकेतील (नवीन) रु.20 च्या बँक नोटेची प्रतिमा व मुख्य लक्षणे पुढीलप्रमाणे आहेत. (1) प्रतिमा ![]() ![]() (2) मुख्य लक्षणे – पुढील (दर्शनी) बाजू (1) मूल्य संख्या 20 सह सी-थ्रु रजिस्टर (2) मूल्याचा अंक 20 देवनागरीमध्ये (3) मध्यभागी महात्मा गांधीचे चित्र (4) सूक्ष्म अक्षरे ‘RBI’; ‘भारत’‘INDIA’व ‘20’ (5) ‘भारत’व RBI ह्या इनस्क्रिप्शेन्ससह, खिडकीयुक्त डिमेटॅलाईज्ड धागा (6) महात्मा गांधींच्या चित्राच्या उजवीकडे, गॅरंटी क्लॉज, प्रॉमीज क्लॉजसह गव्हर्नरांची सही आणि RBI चे चिन्ह. (7) उजवीकडे अशोक स्तंभाचे चिन्ह (8) महात्मा गांधींचे चित्र व इलेक्ट्रो टाईप 20 वॉटर मार्क (9) डावीकडील सर्वात वरच्या बाजूस व पायाकडील उजव्या बाजूस असलेल्या अंक फलकात छोट्यापासून मोठे होत जाणारे अंक. मागील बाजू (10) डावीकडे नोट छापण्याचे वर्ष (11) घोषवाक्यासह स्वच्छ भारत लोगो. (12) भाषा फलक (13) एलोरा लेण्यांचे चित्र (14) 20 हा मूल्यात्मक अंक देवनागरीत. ह्या नोटेचा आकार 63 मि.मी. असेल. योगेश दयाल प्रेस प्रकाशन : 2018-2019/2555 |