<font face="mangal" size="3">महात्मा गांधी मालिकेमधील (नवीन) रु.50 ची बँक नोट  - आरबीआय - Reserve Bank of India
महात्मा गांधी मालिकेमधील (नवीन) रु.50 ची बँक नोट आरबीआयकडून प्रसृत
ऑगस्ट 18, 2017 महात्मा गांधी मालिकेमधील (नवीन) रु.50 ची बँक नोट आरबीआयकडून प्रसृत भारतीय रिझर्व बँक लवकरच, रिझर्व बँकेचे गव्हर्नर, डॉ. उर्जित आर पटेल ह्यांची सही असलेली, महात्मा गांधी मालिकेमधील (नवी) बँक नोट प्रसृत करणार आहे. ह्या नवीन नोटेच्या मागच्या बाजूस देशाचा सांस्कृतिक वारसा दर्शविणारे, रथासह हंपीचे चित्र असेल. ह्या नोटेचा मूळ/पार्श्व रंग फ्ल्युरोसंट निळा असेल. ह्या नोटेच्या दर्शनी व मागच्या बाजूवरही, एकंदर रंग योजनेशी मेळ असणारी इतर डिझाईन्स व भौमितिक आकृती असतील. भारतीय रिझर्व बँकेने ह्यापूर्वीच्या मालिकांमध्ये दिलेल्या रु.50 च्या नोटाही, वैध चलन असणे सुरु राहील. महात्मा गांधी मालिकेतील (नवी) ह्या रु.50 च्या बँक नोटेची प्रतिमा व मुख्य लक्षणे खालीलप्रमाणे आहेत. (1) प्रतिमा ![]() (2) मुख्य लक्षणे (दर्शनी बाजू) (1) 50 हे मूल्य असलेले आरपार दिसणारे रजिस्टर मागील (पाठची) बाजू (10) छपाईचे वर्ष नोटेच्या डाव्या बाजूस ह्या नोटेचा आकार 66 मिमी x 135 मिमी असेल. जोस जे कत्तूर वृत्तपत्र निवेदन : 2017-2018/481 |