इनसेट अक्षर ‘ई’ असलेल्या, महात्मा गांधी मालिकेमधील (नवी) रु.500 च्या नोटांचे वितरण
नोव्हेंबर 08, 2016 इनसेट अक्षर ‘ई’ असलेल्या, महात्मा गांधी मालिकेमधील (नवी) रु.500 च्या नोटांचे वितरण भारतीय रिझर्व बँक लवकरच, दोन्हीही अंक फलकांमध्ये ‘ई’ हे इनसेट अक्षर असलेल्या, रिझर्व बँकेचे गव्हर्नर डॉ. उर्जित आर पटेल ह्यांची सही असलेल्या व नोटेच्या मागील बाजूवर ‘2016’ हे छपाईचे वर्ष आणि स्वच्छ भारत लोगो असलेल्या रु.500 च्या नोटा प्रसृत करणार आहे.
ह्या नव्या रु.500 च्या नोटा, रंग, आकार, विषय, सुरक्षा लक्षणांच्या जागा आणि डिझाईन ह्या बाबतीत, आधी विहित केलेल्या नोटांपेक्षा (एसबीएन) निराळ्या आहेत. ह्यांची मुख्य लक्षणे म्हणजे -
ह्या नोटेवर दृष्टीबाधित व्यक्तींना नोटेचे मूल्य ओळखता येण्यासाठी ही लक्षणे आहेत (महात्मा गांधींचे चित्र, अशोक स्तंभाचे चिन्ह, ब्लीड लाईन्स, उजवीकडे रु.500 ह्या अक्षरांसह वर्तुळ व ओळख चिन्ह हे इंटाग्लिओ छपाईमध्ये) अल्पना किलावाला वृत्तपत्र निवेदन : 2016-2017/1146 |
पेज अंतिम अपडेट तारीख: