RbiSearchHeader

Press escape key to go back

Past Searches

Theme
Theme
Text Size
Text Size
S1

Notification Marquee

RBI Announcements
RBI Announcements

RbiAnnouncementWeb

RBI Announcements
RBI Announcements

Asset Publisher

78473420

अजिंक्यतारा सहकारी बँक, सातारा ह्यांना रिझर्व बँकेकडून सूचनांचे प्रदान

30 सप्टेंबर, 2015

अजिंक्यतारा सहकारी बँक, सातारा ह्यांना
रिझर्व बँकेकडून सूचनांचे प्रदान

बँकिंग विनियम अधिनियम, 1949 च्या कलम 56 सह वाचित, बँकिंग विनियम अधिनियम, 1949 (सहकारी सोसायट्यांना लागु असलेला) च्या कलम 35 अ च्या पोटकलम (1) ने दिलेल्या अधिकाराचा वापर करुन, रिझर्व बँकेद्वारा, अजिंक्यतारा सहकारी बँक, सातारा, महाराष्ट्र ह्यांना काही सूचना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार, वरील बँक, रिझर्व बँकेची लेखी पूर्व मंजुरी प्राप्त केल्याशिवाय, पुढील कार्यकृती करु शकणार नाही, कोणत्याही प्रकारच्या कर्जांचे किंवा अग्रिम राशींचे नूतनीकरण करणे, कोणतीही गुंतवणुक करणे, निधी कर्जाऊ घेऊन व नवीन ठेवी स्वीकारुन जबाबदारी घेणे, तिची दायित्वे व जबाबदा-या पूर्ण करण्यासाठीही कोणतेही प्रदान करणे किंवा प्रदान करण्यास राजी होणे, कोणत्याही प्रकारची तडजोड किंवा व्यवस्था करुन, आरबीआयच्या 28 सप्टेंबर, 2015 मध्ये अधिसूचित केलेल्या सोडल्यास, (ह्याची एक प्रत, जनतेच्या माहितीसाठी वरील बँकेच्या कार्यालयात प्रदर्शित केली आहे) कोणत्याही मालमत्तेची किंवा अॅसेटची विक्री किंवा हस्तांतरण करणे किंवा अन्यथा वासलात लावणे. विशेषतः आरबीआयच्या वरील सूचनांमध्ये दिलेल्या अटीनुसार, कोणाच्याही नावे असलेल्या, प्रत्येक बचत किंवा चालु किंवा अन्य ठेव खात्यामध्ये असलेल्या एकूण शिल्लक रकमेमधून, त्या ठेवीदाराला, रु.1,000/- (रुपये एक हजार फक्त) पर्यंतच्या रकमेची निकासी करण्यास परवानगी दिली जावी.

रिझर्व बँकेने दिलेल्या ह्या सूचनांचा अर्थ, ह्या बँकेचा परवाना रिझर्व बँकेने रद्द केला आहे असा समजला जाऊ नये. बँकेची आर्थिक परिस्थिती सुधारेपर्यंत, ही बँक, निर्बंधांसह, बँकिंग व्यवहार करणे सुरु ठेवू शकते. परिस्थितीवर अवलंबून ह्या सूचनांमध्ये बदल करण्याचा विचारही रिझर्व बँक करु शकते.

अजित प्रसाद
सहाय्यक महाव्यवस्थापक

वृत्तपत्र निवेदन : 2015-2016/796

RbiTtsCommonUtility

प्ले हो रहा है
ऐका

Related Assets

RBI-Install-RBI-Content-Global

RbiSocialMediaUtility

भारतीय रिझर्व्ह बँक मोबाईल ॲप्लिकेशन इंस्टॉल करा आणि नवीनतम बातम्यांचा त्वरित ॲक्सेस मिळवा!

Scan Your QR code to Install our app

RbiWasItHelpfulUtility

हे पेज उपयुक्त होते का?