RbiSearchHeader

Press escape key to go back

Past Searches

Page
Official Website of Reserve Bank of India

Notification Marquee

आरबीआई की घोषणाएं
आरबीआई की घोषणाएं

RbiAnnouncementWeb

RBI Announcements
RBI Announcements

Asset Publisher

78524582

डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर अर्बन को-ऑपरेटिव बँक लि., निलंगा, जिल्हा लातुर, महाराष्ट्र ह्यांना आरबीआयकडून निर्देश लागु

फेब्रुवारी 22, 2019

डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर अर्बन को-ऑपरेटिव बँक लि., निलंगा, जिल्हा लातुर, महाराष्ट्र ह्यांना आरबीआयकडून निर्देश लागु

भारतीय रिझर्व बँकेने, डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर अर्बन को-ऑपरेटिव बँक लि., निलंगा, जिल्हा लातुर, महाराष्ट्र ह्यांना फेब्रुवारी 16, 2019 रोजीचे व्यवहार बंद झाल्यापासून सहा महिन्यांच्या कालावधीसाठी निर्देश लागु केले आहेत.

ह्या निर्देशांनुसार, डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर अर्बन को-ऑपरेटिव बँक लि., निलंगा, जिल्हा लातुर, भारतीय रिझर्व बँकेची लेखी पूर्व-मंजुरी प्राप्त केल्याशिवाय, कोणतीही कर्जे किंवा अग्रिम राशी देणार नाही किंवा नूतनीकृत करु शकणार नाही, निधी कर्जाऊ घेणे व नवीन ठेवी घेणे ह्यासह कोणतेही दायित्व घेणार नाही, तिचे दायित्व किंवा जबाबदारी पूर्ण करण्यासाठी किंवा अन्यथा कोणतीही तडजोड किंवा करार करुन, रिझर्व बँकेच्या निर्देशात अधिसूचित केलेल्या सोडल्यास, तिच्या कोणत्याही मालमत्तांची विक्री, हस्तांतरण करु शकणार नाही किंवा तिची वासलात लावू शकणार नाही. ह्याशिवाय, प्रत्येक बचत बँक खाते, किंवा चालु खाते किंवा अन्य कोणतेही नाव दिलेले ठेव खाते ह्यामधील एकूण शिल्लक रकमेमधून रु.1,000/- (रुपये एक हजार) पर्यंतची रक्कम काढण्यास वरील बँक तिच्या ठेवीदारांना परवानगी देऊ शकेल. मात्र जेथे अशा ठेवीदारावर त्या बँकेचे कोणत्याही प्रकारचे दायित्व असल्यास, म्हणजे कर्जदार किंवा हमीदार म्हणून, तेथे ती रक्कम सर्वप्रथम संबंधित कर्ज खात्यात समायोजित केली जाईल.

बँकिंग विनियामक अधिनियम 1949 च्या (एएसीएस) कलम 56 सह वाचित कलम 35अ च्या पोटकलम (1) खाली देण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करुन भारतीय रिझर्व बँकेने हे निर्देश जारी केले होते. संबंधित जनतेच्या माहितीसाठी ह्या निर्देशांची एक प्रत बँकेच्या कार्यालयात लावण्यात आली आहे.

रिझर्व बँकेने हे निर्देश दिले ह्याचा अर्थ, वरील बँकेचा बँकिंग परवाना रिझर्व बँकेने रद्द केला आहे असा घेण्यात येऊ नये. वरील बँकेची आर्थिक स्थिती सुधारेपर्यंत ती बँक निर्बधांसह बँकिंग व्यवसाय करणे सुरु ठेवू शकते. परिस्थितीवर अवलंबून ह्या निर्देशात बदल करण्याचा विचार रिझर्व बँक करु शकते.

अनिरुध्द डी. जाधव
सहाय्यक व्यवस्थापक

वृत्तपत्र निवेदन : 2018-2019/2009

RbiTtsCommonUtility

प्ले हो रहा है
ऐका

Related Assets

RBI-Install-RBI-Content-Global

RbiSocialMediaUtility

भारतीय रिझर्व्ह बँक मोबाईल ॲप्लिकेशन इंस्टॉल करा आणि नवीनतम बातम्यांचा त्वरित ॲक्सेस मिळवा!

आमचे अ‍ॅप इंस्टॉल करण्यासाठी QR कोड स्कॅन करा

RbiWasItHelpfulUtility

पेज अंतिम अपडेट तारीख:

हे पेज उपयुक्त होते का?