<font face="mangal" size="3">केरळ मर्कंटाईल को-ऑपरेटिव बँक लि. क्र. 2626, कोझीको - आरबीआय - Reserve Bank of India
केरळ मर्कंटाईल को-ऑपरेटिव बँक लि. क्र. 2626, कोझीकोडे, केरळ ह्यांना आरबीआय कडून निर्देश लागु
जून 4, 2019 केरळ मर्कंटाईल को-ऑपरेटिव बँक लि. क्र. 2626, कोझीकोडे, केरळ ह्यांना आरबीआय कडून निर्देश लागु निर्देश दि. मे 29, 2019 अन्वये, भारतीय रिझर्व्ह बँकेने, केरळ मर्कंटाईल को-ऑपरेटिव बँक लि. क्र. 2626, कोझीकोडे, केरळ ह्यांना निर्देशांखाली ठेवले आहे. ह्या निर्देशानुसार, प्रत्येक बचत बँक खाते, किंवा चालु खाते किंवा अन्य कोणतेही नाव दिलेले ठेव खाते ह्यामधील एकूण शिल्लकेमधून, ठेवीदारांना रु.2,000/- (रुपये दोन हजार) पर्यंतची रक्कम काढण्यास, आरबीआयच्या निर्देशातील अटींवर, परवानगी देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे, रिझर्व्ह बँकेची लेखी पूर्व मंजुरी घेतल्याशिवाय, केरळ मर्कंटाईल कोऑपरेटिव बँक लि. क्र. 2626, कोझीकोडे, केरळ, कोणतीही कर्जे किंवा अग्रिम राशी देऊ शकणार नाही किंवा नूतनीकृत करु शकणार नाही, कोणतीही गुंतवणुक करणार नाही, निधी कर्जाऊ घेऊन व नवीन ठेवींचा स्वीकार ह्यासह कोणतीही नवीन जबाबदारी घेणार नाही, तिची जबाबदारी व दायित्व म्हणून किंवा अन्यथा कोणतेही प्रदान करणार नाही किंवा त्यासाठी राजी असणार नाही, कोणत्याही प्रकारची तडजोड किंवा व्यवस्था करुन, आरबीआयच्या मे 29, 2019 रोजीच्या निर्देशात अधिसूचित केलेल्या सोडल्यास, तिच्या कोणत्याही मालमत्तांची किंवा अॅसेट्सची विक्री, हस्तांतरण किंवा अन्य प्रकारे वासलात करु शकणार नाही. वरील बँकेचे जून 4, 2019 रोजीचे व्यवहार बंद झाल्यापासून, हे निर्देश सहा महिन्यांच्या कालावधीसाठी लागु असतील. भारतीय रिझर्व्ह बँकेने दिलेल्या ह्या निर्देशांचा अर्थ, रिझर्व्ह बँकेने वरील बँकेचा बँकिंग परवाना रद्द केला आहे असा घेण्यात येऊ नये. बँकेची परिस्थिती सुधारे पर्यंत ती बँक तिचा बँकिंग व्यवसाय निर्बंधासह करणे सुरु ठेवू शकते. परिस्थितीवर अवलंबून ह्या निर्देशात बदल करण्याचा विचार रिझर्व्ह बँक करु शकते. बँकिंग विनियामक अधिनियम 1949 च्या (एएसीएस) कलम 56 सह वाचित कलम 35 अ च्या पोटकलम (1) खाली देण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करुन, भारतीय रिझर्व्ह बँकेने हे निर्देश जारी केले आहेत. हितसंबंधित जनतेच्या माहितीसाठी ह्या निर्देशांची एक प्रत वरील बँकेच्या कार्यालयात लावण्यात आली आहे. अजित प्रसाद प्रेस प्रकाशन : 2018-2019/2862 |