RbiSearchHeader

Press escape key to go back

Past Searches

Page
Official Website of Reserve Bank of India

Notification Marquee

RBI Announcements
RBI Announcements

RbiAnnouncementWeb

RBI Announcements
RBI Announcements

Asset Publisher

78497552

नवोदय नागरी सहकारी बँक लि., नागपुर, जिल्हा नागपुर, महाराष्ट्र ह्यांना आरबीआयकडून निदेश

डिसेंबर 16, 2016

नवोदय नागरी सहकारी बँक लि., नागपुर, जिल्हा नागपुर, महाराष्ट्र ह्यांना
आरबीआयकडून निदेश

भारतीय रिझर्व बँकेने, नवोदय नागरी सहकारी बँक लि., नागपुर, जिल्हा नागपुर, महाराष्ट्र ह्यांच्यावर डिसेंबर 15, 2016 च्या व्यवहार बंद झाल्यापासून सहा महिन्यांच्या कालावधीसाठी निदेश लागु केले आहेत.

ह्या निदेशांनुसार, नवोदय नागरी सहकारी बँक लि., नागपुर, भारतीय रिझर्व बँकेकडून लेखी पूर्व मंजुरी घेतल्याशिवाय, कोणतीही कर्जे किंवा अग्रिम राशी देऊ शकणार नाही किंवा त्यांचे नूतनीकरण करु शकणार नाही; कोणतीही गुंतवणुक करु शकणार नाही; कोणतीही जबाबदारी (निधी कर्जाऊ घेणे व नवीन ठेवी स्वीकारणे समाविष्ट) घेणार नाही; तिचे दायित्व किंवा जबाबदारी म्हणून किंवा अन्यथा कोणतेही प्रदान करणार नाही किंवा तसे करण्यास राजी होणार नाही. रिझर्व बँकेच्या सूचनांमध्ये अधिसूचित केल्या व्यतिरिक्त, कोणतीही तडजोड किंवा व्यवस्था करुन तिच्या मालमत्तेची विक्री, हस्तांतरण किंवा अन्य प्रकारे वासलात करु शकणार नाही. ह्याशिवाय, डिसेंबर 15, 2016 पासून ह्या निदेशांच्या सहा महिन्यांच्या कालावधीत, तिच्या ठेवीदारांना, प्रत्येक बचत खात्यामधून किंवा चालु खात्यामधून किंवा अन्य कोणत्याही ठेव खात्यातून, शिल्लक असलेल्या रकमेमधून, एका वेळी, रु.1,000/- (रुपये एक हजार फक्त) पर्यंतची रक्कम काढण्यास वरील बँक परवानगी देईल.

बँकिंग विनियामक अधिनियम 1949 च्या कलम 56 सह वाचित, बँकिंग विनियामक अधिनियम 1949 च्या कलम 35अ च्या पोटकलम (1) खाली तिला देण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करुन रिझर्व बँकेने हे निदेश जारी केले आहेत. संबंधित जनतेच्या माहितीसाठी वरील निदेशांची एक प्रत वरील बँकेच्या कार्यालयात लावण्यात आली आहे.

रिझर्व बँकेने वरील निदेश लागु केले ह्याचा अर्थ, वरील बँकेचा बँकिंग परवाना रिझर्व बँकेने रद्द केला आहे असा समजण्यात येऊ नये. वरील बँकेची आर्थिक स्थिती सुधारेपर्यंत, ती बँक, निर्बधांसह तिचे बँकिंग व्यवहार सुरुच ठेवील. परिस्थितीनुसार ह्या निदेशांमध्ये बदल/सुधारणा करण्याचा विचार रिझर्व बँक करु शकते.

अजित प्रसाद
सहाय्यक सल्लागार

वृत्तपत्र निवेदन : 2016-2017/1552

RbiTtsCommonUtility

प्ले हो रहा है
ऐका

Related Assets

RBI-Install-RBI-Content-Global

RbiSocialMediaUtility

भारतीय रिझर्व्ह बँक मोबाईल ॲप्लिकेशन इंस्टॉल करा आणि नवीनतम बातम्यांचा त्वरित ॲक्सेस मिळवा!

आमचे अ‍ॅप इंस्टॉल करण्यासाठी QR कोड स्कॅन करा

RbiWasItHelpfulUtility

पेज अंतिम अपडेट तारीख:

हे पेज उपयुक्त होते का?