<font face="mangal" size="3">दि सिटी को-ऑपरेटिव बँक लि., मुंबई, महाराष्ट्र ह् - आरबीआय - Reserve Bank of India
दि सिटी को-ऑपरेटिव बँक लि., मुंबई, महाराष्ट्र ह्यांना आरबीआयकडून निर्देश लागु
एप्रिल 18, 2018 दि सिटी को-ऑपरेटिव बँक लि., मुंबई, महाराष्ट्र ह्यांना आरबीआयकडून निर्देश लागु भारतीय रिझर्व बँकेने (निर्देश डीसीबीएस.सीओ.बीएसडी-आय/डी-5/12.22.039/2017-18 दि. एप्रिल 17, 2018 अन्वये) दि सिटी को-ऑपरेटिव बँक लि., मुंबई, महाराष्ट्र ह्यांना निर्देशांखाली ठेवले आहे. ह्या निर्देशांनुसार, आरबीआयने दिलेल्या निर्देशांच्या अटींवर ठेवीदारांना त्यांच्या प्रत्येक बचत किंवा चालु खाते किंवा अन्य कोणतेही नाव असलेल्या खात्यामधील एकूण शिल्लक रकमेमधून रु.1,000 (रुपये एक हजार) पर्यंतची रक्कम काढण्यास परवानगी आहे. दि सिटी को-ऑपरेटिव बँक लि., मुंबई, महाराष्ट्र, भारतीय रिझर्व बँकेची लेखी पूर्व-मंजुरी घेतल्याशिवाय, कोणतीही नवीन कर्जे किंवा अग्रिम राशी देऊ शकणार नाही किंवा नूतनीकृत करु शकणार नाही, कोणतीही गुंतवणुक करु शकणार नाही, निधी कर्जाऊ घेणे व नवीन ठेवी घेणे ह्यासह कोणतीही नवीन जबाबदारी घेऊ शकणार नाही, तिचे दायित्व किंवा जबाबदारी म्हणून प्रदान करणार नाही किंवा प्रदान करण्यास राजी दर्शविणार नाही, कोणत्याही प्रकारची तडजोड किंवा करार करुन, आरबीआयच्या एप्रिल 17, 2018 च्या निर्देशांमध्ये अधिसूचित केलेल्या बाबी/मालमत्ता सोडल्यास, तिची कोणतीही मालमत्ता विकणार नाही, हस्तांतरित करणार नाही किंवा अन्यथा वासलात लावू शकणार नाही. हे निर्देश, एप्रिल 17, 2018 रोजीचे व्यवहार बंद झाल्यावर देण्यात आले आहेत. भारतीय रिझर्व बँकेने दिलेल्या ह्या निर्देशांचा अर्थ, रिझर्व बँकेने वरील बँकेचा बँकिंग परवाना रद्द केला आहे असा घेण्यात येऊ नये. वरील बँकेची आर्थिक स्थिती सुधारेपर्यंत, ती बँक तिचे बँकिंग व्यवहार निर्बंधांसह करणे सुरु ठेवू शकते. परिस्थितीवर अवलंबून ह्या निर्देशात बदल करण्याचा विचार रिझर्व बँक करु शकते. बँकिंग विनियामक अधिनियम 1949 च्या कलम 56 सह वाचित कलम 35अ चा पोटकलम (1) खाली देण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करुन हे निर्देश लागु करण्यात आले आहेत. संबंधित जनतेच्या माहितीसाठी ह्या निर्देशांची एक प्रत वरील बँकेच्या कार्यालयात लावण्यात आली आहे. अजित प्रसाद वृत्तपत्र निवेदन : 2017-2018/2761 |