RbiSearchHeader

Press escape key to go back

Past Searches

Page
Official Website of Reserve Bank of India

Notification Marquee

RBI Announcements
RBI Announcements

RbiAnnouncementWeb

RBI Announcements
RBI Announcements

Asset Publisher

78503189

दि नीड्स ऑफ लाईफ को-ऑपरेटिव बँक लि., मुंबई, महाराष्ट्र ह्यांना आरबीआयकडून निर्देश लागु

ऑक्टोबर 29, 2018

दि नीड्स ऑफ लाईफ को-ऑपरेटिव बँक लि., मुंबई, महाराष्ट्र ह्यांना आरबीआयकडून निर्देश लागु

भारतीय रिझर्व बँकेने (निर्देश डीसीबीएस.सीओ.बीएसडी-आय/डी-3/12.22.163/2018-19 दि. ऑक्टोबर 26, 2018 अन्वये) दि नीड्स ऑफ लाईफ को-ऑपरेटिव बँक लि., मुंबई, महाराष्ट्र ह्यांना निर्देशांखाली ठेवले आहे. ह्या निर्देशांनुसार, प्रत्येक बचत बँक खाते, किंवा चालु खाते किंवा इतर कोणतेही नाव देण्यात आलेले ठेव खाते ह्यामधील एकूण शिल्लक रकमेमधून रु.1,000/- (रुपये एक हजार) पर्यंतची रक्कम, वरील निर्देशातील अटींनुसार काढण्यास ठेवीदारांना परवानगी देण्यात आली आहे. रिझर्व बँकेकडून लेखी पूर्व मंजुरी घेतल्याशिवाय, दि नीड्स ऑफ लाईफ को-ऑपरेटिव बँक लि., मुंबई, कोणतीही नवी कर्जे देऊ शकणार नाही किंवा नूतनीकृत करु शकणार नाही, कोणतीही गुंतवणुक करु शकणार नाही किंवा निधी उधार घेणे व नवीन ठेवी स्वीकारणे ह्यासह नवीन जबाबदारी घेणार नाही, तिचे दायित्व किंवा जबाबदारी म्हणून किंवा अन्यथा, कोणतेही प्रदान करणार नाही किंवा तसे करण्यास राजी असणार नाही, कोणत्याही प्रकारची तडजोड किंवा करार करुन, दि. ऑक्टोबर 26, 2018 च्या आरबीआयच्या निर्देशात अधिसूचित केल्यानुसार सोडून, तिच्या मालमत्तेचे हस्तांतरण किंवा वासलात करु शकणार नाही. ऑक्टोबर 29, 2018 रोजी वरील बँकेचे व्यवहार बंद झाल्यापासून सहा महिन्यांच्या कालावधीसाठी हे निर्देश लागु/जारी असतील.

रिझर्व बँकेने दिलेल्या ह्या निर्देशाचा अर्थ, रिझर्व बँकेने वरील बँकेचा बँकिंग परवाना रद्द केला आहे असा घेण्यात येऊ नये. त्या बँकेची आर्थिक स्थिती सुधारेपर्यंत ती बँक निर्बंधासह बँकिंग व्यवसाय करणे सुरु ठेवू शकते. परिस्थितीवर अवलंबून ह्या निर्देशात बदल करण्याचा विचार रिझर्व बँक करु शकते.

बँकिंग विनियामक अधिनियम 1949 च्या कलम 56 सह वाचित कलम 35अ च्या पोटकलम (1) खाली तिला देण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करुन रिझर्व बँकेने हे निर्देश लागु केले आहेत. संबंधित जनतेच्या माहितीसाठी ह्या निर्देशांची एक प्रत वरील बँकेच्या कार्यालयात लावण्यात आली आहे.

अनिरुध्द डी. जाधव
सहाय्यक व्यवस्थापक

वृत्तपत्र निवेदन : 2018-2019/994

RbiTtsCommonUtility

प्ले हो रहा है
ऐका

Related Assets

RBI-Install-RBI-Content-Global

RbiSocialMediaUtility

भारतीय रिझर्व्ह बँक मोबाईल ॲप्लिकेशन इंस्टॉल करा आणि नवीनतम बातम्यांचा त्वरित ॲक्सेस मिळवा!

आमचे अ‍ॅप इंस्टॉल करण्यासाठी QR कोड स्कॅन करा

RbiWasItHelpfulUtility

पेज अंतिम अपडेट तारीख:

हे पेज उपयुक्त होते का?