RbiSearchHeader

Press escape key to go back

Past Searches

Page
Official Website of Reserve Bank of India

Notification Marquee

आरबीआई की घोषणाएं
आरबीआई की घोषणाएं

RbiAnnouncementWeb

RBI Announcements
RBI Announcements

Asset Publisher

78523559

शिवाजीराव भोसले सहकारी बँक लि. पुणे ह्यांचेवर आरबीआयचे निर्देश लागु

मे 6, 2019

शिवाजीराव भोसले सहकारी बँक लि. पुणे ह्यांचेवर आरबीआयचे निर्देश लागु

भारतीय रिझर्व्ह बँकेने (निर्देश दि. मे 3, 2019 अन्वये) शिवाजीराव भोसले सहकारी बँक लि. पुणे ह्यांना सर्वसमावेशक निर्देशांखाली ठेवले आहे. ह्या निर्देशांनुसार, प्रत्येक बचत बँक खाते, किंवा चालु खाते किंवा अन्य कोणतेही नाव दिलेले खाते ह्यामधील एकूण शिल्लक रकमेमधून, आरबीआयच्या निर्देशांमध्ये दिलेल्या अटीवर, ठेवीदारांना रु.1,000/- (रुपये एक हजार) पर्यंतची रक्कम काढण्यास परवानगी देण्यात आली आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेची लेखी पूर्व मंजुरी घेतल्याशिवाय, शिवाजीराव भोसले सहकारी बँक लि. पुणे, कोणतीही कर्जे किंवा अग्रिम राशी देऊ शकणार नाही किंवा नूतनीकृत करु शकणार नाही, निधी कर्जाऊ घेऊन किंवा नवीन ठेवी स्वीकारुन कोणतेही दायित्व घेणार नाही, तिची जबाबदारी किंवा दायित्व म्हणून किंवा अन्यथा कोणतेही प्रदान करणार नाही किंवा तसे करण्यास राजी होणार नाही, आरबीआयच्या मे 3, 2019 रोजीच्या निर्देशात अधिसूचित केल्यानुसार सोडल्यास, कोणत्याही प्रकारची तडजोड किंवा करार करुन, तिच्या मालमत्तांची किंवा अॅसेट्सची विक्री, हस्तांतरण किंवा अन्य प्रकारे वासलात करु शकणार नाही. हे निर्देश, मे 4, 2019 रोजीचे व्यवहार समाप्त झाल्यापासून देण्यात आले आहेत.

भारतीय रिझर्व्ह बँकेने दिलेल्या ह्या निर्देशांचा अर्थ, रिझर्व्ह बँकेने वरील बँकेचा बँकिंग परवाना रद्द केला आहे असा घेण्यात येऊ नये. वरील बँकेची आर्थिक स्थिती सुधारेपर्यंत ती बँक तिचा बँकिंग व्यवसाय निर्बंधासह करु शकते. परिस्थितीवर अवलंबून ह्या निर्देशांमध्ये बदल करण्याचा विचार रिझर्व्ह बँक करु शकते.

बँकिंग विनियामक अधिनियम 1949 च्या कलम 56 सह वाचित कलम 35 अ च्या पोटकलम (1) खाली देण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करुन भारतीय रिझर्व्ह बँकेने हे निर्देश दिले आहेत. संबंधित जनतेच्या माहितीसाठी ह्या निर्देशांची एक प्रत वरील बँकेच्या कार्यालयामध्ये प्रदर्शित करण्यात आली आहे.

शैलजा सिंग
उप महाव्यवस्थापक

प्रेस प्रकाशन : 2018-2019/2609

RbiTtsCommonUtility

प्ले हो रहा है
ऐका

Related Assets

RBI-Install-RBI-Content-Global

RbiSocialMediaUtility

भारतीय रिझर्व्ह बँक मोबाईल ॲप्लिकेशन इंस्टॉल करा आणि नवीनतम बातम्यांचा त्वरित ॲक्सेस मिळवा!

आमचे अ‍ॅप इंस्टॉल करण्यासाठी QR कोड स्कॅन करा

RbiWasItHelpfulUtility

पेज अंतिम अपडेट तारीख:

हे पेज उपयुक्त होते का?