<font face="Mangal" size="3"> आरबीआयने इंफाळमध्ये उपकार्यालय उघडले</font> - आरबीआय - Reserve Bank of India
आरबीआयने इंफाळमध्ये उपकार्यालय उघडले
ऑक्टोबर 17, 2015 आरबीआयने इंफाळमध्ये उपकार्यालय उघडले भारतीय रिझर्व बँकेने, ऑक्टोबर 17, 2015 रोजी इंफाळ येथे तिचे उपकार्यालय उघडले आहे. श्री. ओ. आयबोबी सिंग (मा. मुख्यमंत्री मणीपुर) व श्री. हरुण आर खान, रिझर्व बँकेचे उप गव्हर्नर ह्यांनी इंफाळ येथील ह्या उपकार्यालयाचे उद्घाटन केले. ह्या उपकार्यालयाचा माहिती तपशील पुढीलप्रमाणे आहे. टपाल पत्ता संपर्क: इंफाळ येथील रिझर्व बँकेच्या कार्यालयात, वित्तीय समावेशन व विकास विभाग ग्राहक शिक्षण व सुरक्षा कक्ष आणि मार्केट इंटलिजन्स युनिट हे विभाग असतील. इंफाळ येथे कार्यालय उघडल्यामुळे, रिझर्व बँकेची आता ईशान्येमधील सात राज्यात 5 कार्यालये असतील. इंफाळ येथील हे कार्यालय, ह्या राज्याच्या वित्तीय व बँकिंग विकासासाठी, राज्य सरकार, नाबार्ड आणि इतर बँका ह्यांच्याबरोबर जवळून समन्वय साधील. इंफाळमध्ये रिझर्व बँकेचे कार्यालय उघडण्याच्या रिझर्व बँकेच्या पुढाकाराबाबत तिची स्तुती करताना, मुख्यमंत्री म्हणाले की, बँका नसलेल्या क्षेत्रात शक्य तेवढ्या लवकर बँका उघडल्या जाव्यात. ह्या राज्याच्या समावेशक विकासामध्ये रिझर्व बँक, नाबार्ड व इतर बँकांनी अधिक सक्षम भूमिका बजाविण्यावर त्यांनी जोर दिला. त्यांनी निर्देशित केले की, ग्रामीण पायाभूत सोयी विकास निधी (आरआयडीएफ) खाली, हे राज्य सरकार, पूर नियंत्रणावर लक्ष केंद्रित करील. श्री. हरुण आर. खान, डेप्युटी गव्हर्नर म्हणाले की, ईशान्येकडील राज्यांच्या (त्यातही मणिपुर सारखी छोटी राज्ये) आर्थिक व वित्तीय विकासासाठीच्या गरजांबाबत, रिझर्व बँक संवेदनशील असून, इंफाळमध्ये कार्यालय उघडणे ही ह्या दिशेने टाकलेले पहिले पाऊल आहे. रिझर्व बँकांची भूमिका व कार्ये समजावून सांगताना श्री. खान म्हणाले की, येथील डोंगराळ प्रदेश नजरेसमोर ठेवून, ईशान्येकडील प्रदेशासाठी, रिझर्व बँक, तिची प्रदान प्रणालीबाबतच्या दूरदृष्टी उपयोगात आणत आहे. ते म्हणाले की, बँकिंग व्यवहार दूरपर्यंत/आतपर्यंत जाईल एवढी सुधारणा होण्याची गरज आहे. त्याचप्रमाणे त्यांनी, शेतकी (विशेषतः सेंद्रिय शेतकी), पुष्पोद्योग, हातमाग व हस्तकला, स्वयंसेवी गट, संयुक्त दायित्व गट आणि निर्यात विकास ह्यांचा ‘पूर्वेकडे पहा धोरणा’ खाली भविष्यात विकास करण्यावरही जोर दिला. बँकांच्या शाखांमार्फत व त्यांच्या व्यवसायप्रतिनिधींमार्फत बँकिंग सुविधा सुधारण्यासाठी डिजीटल जोडणी क्षमता असण्यावरही त्यांनी जोर दिला. श्रीमती दीपाली पंत जोशी (रिझर्व बँकेच्या कार्यकारी संचालिका), श्री. ओ नबकिशोर सिंग (मणिपुर सरकारचे मुख्य सचिव), श्री. एस एस बारिक (प्रादेशिक संचालक, ईशान्यकडील राज्ये), राज्य सरकारचे, वाणिज्य बँकांचे व रिझर्व बँकेचे वरिष्ठ अधिकारीही ह्या प्रसंगी उपस्थित होते. इंफाळ कार्यालयाचे प्रभारी अधिकारी श्री. हाऊझेल ह्यांनी उपस्थितांचे आभार मानले. अल्पना किल्लावाला वृत्तपत्र निवेदन: 2015-2016/937 |