आरबीआयकडून डेहराडुन येथे बँकिंग लोकपाल कार्यालयाचे उद्घाटन
डिसेंबर 23, 2016 आरबीआयकडून डेहराडुन येथे बँकिंग लोकपाल कार्यालयाचे उद्घाटन अलिकडील भूतकाळात बँकिंग जाळ्यात झालेली लक्षणीय वाढ आणि कानपुर येथील बँकिंग लोकपालाच्या कार्यालयाचे मोठे कार्यक्षेत्र ह्यांना विचारात घेऊन भारतीय रिझर्व बँकेने डेहराडुन येथे, भारतीय रिझर्व बँकेच्या बँकिंग लोकपालाचे कार्यालय स्थापन केले आहे. डेहराडुन येथील रिझर्व बँकेतील बँकिंग लोकपालाच्या कार्यालयाचे कार्यक्षेत्र संपूर्ण उत्तराखंडात असेल. तसेच पश्चिम उत्तर प्रदेशातील सात जिल्ह्यांमध्येही सहरानपुर, शामली (प्रबुध नगर) मुझफ्फर नगर, बाघपत, मीरत, बिजनोर व अमरोहा (ज्योतिबा फुले नगर) असेल. सध्या हे जिल्हे, ओबीओ कानपुर ह्यांच्या अधिकार क्षेत्रात आहेत. अजित प्रसाद वृत्तपत्र निवेदन : 2016-2017/1642 |
पेज अंतिम अपडेट तारीख: