जम्मु येथे आरबीआयकडून बँकिंग लोकपाल कार्यालयाचे उद्घाटन
एप्रिल 18, 2017 जम्मु येथे आरबीआयकडून बँकिंग लोकपाल कार्यालयाचे उद्घाटन अलिकडील भूतकाळात, बँकिंग नेटवर्कमध्ये झालेली लक्षणीय वाढ, आणि नवी दिल्ली-1 येथील बँकिंग लोकपालाच्या विद्यमान कार्यालयाचे मोठे अधिकार क्षेत्र विचारात घेऊन, भारतीय रिझव बँकेने, जम्मु व काश्मिर ह्या राज्यांसाठी, जम्मु येथील भारतीय रिझर्व बँकेच्या कार्यालयात, एक बँकिंग लोकपालाचे कार्यालय उघडले आहे. भारतीय रिझर्व बँक, जम्मु येथील बँकिंग लोकपालाच्या कार्यालयाचे अधिकारक्षेत्र, संपूर्ण जम्मु व काश्मिर राज्यावर असेल. हे अधिकारक्षेत्र पूर्वी, बँकिंग लोकपाल कार्यालय, नवी दिल्ली-1 ह्यांच्याखाली होते. अल्पना किलावाला वृत्तपत्र निवेदन : 2016-2017/2807 |
पेज अंतिम अपडेट तारीख: