आरबीआयकडून रांची येथे बँकिंग लोकपाल कार्यालयाचे उद्घाटन
डिसेंबर 23, 2016 आरबीआयकडून रांची येथे बँकिंग लोकपाल कार्यालयाचे उद्घाटन अलिकडील भूतकाळात बँकिंग नेटवर्कमध्ये झालेली लक्षणीय वाढ, आणि पाटणा येथील विद्यमान बँकिंग कार्यालयाचे मोठे कार्यक्षेत्र विचारात घेऊन, भारतीय रिझर्व बँकेने, झारखंड राज्यासाठी, बँकिंग लोकपाल कार्यालय, रांची येथील भारतीय रिझर्व बँकेमध्ये उघडले आहे. रांची येथील भारतीय रिझर्व बँकेमधील बँकिंग लोकपाल कार्यालयाचे कार्यक्षेत्र/अधिकारक्षेत्र, संपूर्ण झारखंड राज्यात लागु असेल. झारखंड राज्य पूर्वी पाटणा येथील बँकिंग लोकपाल कार्यालयाच्या अधिकारक्षेत्राखाली होते. अजित प्रसाद वृत्तपत्र निवेदन : 2016-2017/1643 |
पेज अंतिम अपडेट तारीख: