RbiSearchHeader

Press escape key to go back

Past Searches

Theme
Theme
Text Size
Text Size
S3

Notification Marquee

आरबीआई की घोषणाएं
आरबीआई की घोषणाएं

RbiAnnouncementWeb

RBI Announcements
RBI Announcements

Asset Publisher

78523672

आरबीआयकडून नवी दिल्ली येथे तिस-या लोकपाल कार्यालयाची स्थापना

जून 28, 2019

आरबीआयकडून नवी दिल्ली येथे तिस-या लोकपाल कार्यालयाची स्थापना

डिसेंबर 5, 2018 रोजीच्या नाणेविषयक धोरण निवेदनात घोषित केल्यानुसार, भारतीय रिझर्व्ह बँकेने, जानेवारी 31, 2019 रोजी डिजिटल व्यवहारांसाठीची लोकपाल योजना (ओएसडीटी) सुरु केली.

बँकिंग लोकपाल योजना व ओएसडीटी ह्या खालील तक्रार-निवारणाची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी, रिझर्व्ह बँकेने, बँकिंग लोकपाल (बीओ) व डिजिटल व्यवहारांसाठी बँकिंग लोकपाल (ओडीटी) चे तिसरे कार्यालय नवी दिल्ली (नवी दिल्ली –3) येथे सुरु केले आहे. हे कार्यालय जुलै 1, 2019 पासून कार्यान्वित होईल.

नवी दिल्ली 1, 2 व 3 साठीचे क्षेत्रीय अधिकारक्षेत्र व नवी दिल्ली येथील बीओ व ओडीटीचे ई-मेल आयडी, जुलै 1, 2019 पासून खालीलप्रमाणे असतील :

अनु.क्र बीओ/ओडीटी प्रादेशिक कार्यक्षेत्र इमेल आयडी
1 नवी दिल्ली 1 उत्तर, उत्तर- पश्चिम, पश्चिम, दक्षिण-पश्चिम, नवी दिल्ली आणि दिल्ली चे दक्षिण जिल्हे mailto:bonewdelhi1@rbi.org.in (बीओ साठी)
mailto:odtnewdelhi1@rbi.org.in (ओडीटी साठी)
2 नवी दिल्ली 2 हरियाणा (पंचकुला, यमुना नगर व अंबाला जिल्हा वगळता) आणि उत्तर प्रदेशातील गाझियाबाद व गौतम बुध्द नगर जिल्हे mailto:bonewdelhi2@rbi.org.in (बीओ साठी)
mailto:odtnewdelhi2@rbi.org.in (ओडीटी साठी)
3 नवी दिल्ली 3 उत्तर-पूर्व, मध्य, शाहदरा, दिल्लीचे पूर्व आणि दक्षिण-पूर्व जिल्हे mailto:bonewdelhi3@rbi.org.in (बीओ साठी)
mailto:odtnewdelhi3@rbi.org.in (ओडीटी साठी)

एप्रिल 26, 2019 च्या प्रेस प्रकाशनात घोषित केल्यानुसार, अबँकीय वित्तीय कंपन्यांसाठीच्या लोकपाल योजनेखालील क्षेत्रीय अधिकारक्षेत्रात कोणताही बदल नाही.

योगेश दयाल
मुख्य महाव्यवस्थापक

प्रेस प्रकाशन : 2018-2019/3085

RbiTtsCommonUtility

प्ले हो रहा है
ऐका

Related Assets

RBI-Install-RBI-Content-Global

RbiSocialMediaUtility

भारतीय रिझर्व्ह बँक मोबाईल ॲप्लिकेशन इंस्टॉल करा आणि नवीनतम बातम्यांचा त्वरित ॲक्सेस मिळवा!

Scan Your QR code to Install our app

RbiWasItHelpfulUtility

हे पेज उपयुक्त होते का?