<font face="mangal" size="3">धोलपुर अर्बन सहकारी बँक लि., धोलपुर ह्यांना आ - आरबीआय - Reserve Bank of India
धोलपुर अर्बन सहकारी बँक लि., धोलपुर ह्यांना आरबीआयकडून दंड आकारणी
एप्रिल 07, 2016 धोलपुर अर्बन सहकारी बँक लि., धोलपुर ह्यांना बँकिंग विनियामक अधिनियम 1949 (सहकारी सोसायट्यांना लागु असलेला) च्या कलम 46 (4) सह वाचित, कलम 47 अ (1) (ब) च्या तरतुदींखाली तिला मिळालेल्या अधिकारांचा वापर करुन रिझर्व बँकेने, धोलपुर अर्बन सहकारी बँक लि., धोलपुर ह्यांना रु.1.00 लाख (रुपये एक लाख) दंड लावला आहे व तो दंड, तुमचा ग्राहक जाणा (केवायसी)/अँटी मनी लॉडरिंग (एएमएल) वरील मार्गदर्शक तत्वे/निदेशांचे उल्लंघन केल्याने लावण्यात आला आहे. भारतीय रिझर्व बँकेने वरील बँकेला एक कारणे दाखवा नोटिस दिली होती व त्यावर वरील बँकेने उत्तर सादर केले होते आणि वैयक्तिक सुनावणी केली होती. ह्या प्रकरणातील सत्य गोष्टी व बँकेने दिलेले उत्तर विचारात घेऊन रिझर्व बँक अशा निर्णयाप्रत आली की उल्लंघन झाल्याचे सिध्द झाले असून दंड लावणे आवश्यक आहे. त्यानुसार वरील बँकेला दंड करण्यात आला. अजित प्रसाद वृत्तपत्र निवेदन : 2015-2016/2374 |