<font face="mangal" size="3px">दि सिंध कोऑपरेटिव अर्बन बँक लि. हैद्राबाद, तेल - आरबीआय - Reserve Bank of India
दि सिंध कोऑपरेटिव अर्बन बँक लि. हैद्राबाद, तेलंगणा ह्यांचेवर आरबीआयकडून दंड लागु
नोव्हेंबर 8, 2017 दि सिंध कोऑपरेटिव अर्बन बँक लि. हैद्राबाद, तेलंगणा बँकिंग विनियामक अधिनियम 1949 च्या (सहकारी सोसायट्यांना लागु असल्यानुसार) कलम 46(4) सह वाचित कलम 47अ(1)(ब) ने तिला दिलेल्या अधिकारांचा वापर करुन, भारतीय रिझर्व बँकेने, दि सिंध कोऑपरेटिव अर्बन बँक लि., हैद्राबाद, तेलंगणा ह्यांचेवर रु.50,000/- (रुपये पन्नास हजार मात्र) दंड लागु केला असून, हा दंड, एक्सपोझर नॉर्म्स आणि वैधानिक/इतर निर्बंधांवरील आरबीआयने दिलेल्या मार्गदर्शक तत्वांचे उल्लंघन केल्यामुळे लागु करण्यात आला आहे. भारतीय रिझर्व बँकेने वरील बँकेला एक कारणे दाखवा नोटिस पाठविली होती व त्यावर त्या बँकेने लेखी उत्तर सादर केले होते. ह्या प्रकरणातील सत्य व बँकेने दिलेले उत्तर आणि वैय्यक्तिक सुनावणी ह्यावर विचार करुन, रिझर्व बँकेने निष्कर्ष काढला की, उल्लंघने झाली असून त्याबाबत दंड लावणे आवश्यक आहे. अनिरुध्द डी जाधव वृत्तपत्र निवेदन : 2017-2018/1276 |