निरनिराळ्या डिझाईनच्या रु.10 च्या नाण्यांच्या वैध चलन स्थितीबाबत आरबीआयचे पुनर्निवेदन
जानेवारी 17, 2018 निरनिराळ्या डिझाईनच्या रु.10 च्या नाण्यांच्या वैध चलन स्थितीबाबत आरबीआयचे पुनर्निवेदन भारतीय रिझर्व बँकेच्या नजरेस आले आहे की, काही ठिकाणी, दुकानदार तसेच जनता, रु.10 ची नाणी स्वीकारण्यास, नाण्यांच्या खरेपणाविषयी शंका आल्यानेच हयगय करतात. येथे स्पष्ट करण्यात येते की, भारतीय रिझर्व बँक टाकसाळीत तयार केलेली नाणीच प्रसृत करते व ह्या टाकसाळी भारत सरकारच्याच अधिकाराखाली असतात. ह्या नाण्यांवर निरनिराळी आर्थिक, सामाजिक व सांस्कृतिक मूल्ये दर्शविणारी स्पष्ट लक्षणे असून, ती नाणी वेळोवेळी प्रसृत केली जातात. नाण्यांचे आयुष्य दीर्घकालीन असल्याने, निरनिराळ्या डिझाईन्सची व मूल्याची नाणी एकाच वेळी परिवलित होत असतात. रिझर्व बँकेने आतापर्यंत, 14 डिझाईन्समधील रु.10 ची नाणी दिली असून, त्यांच्या स्पष्ट लक्षणांबाबत जनतेला वृत्तपत्र निवेदनांमार्फत कळविण्यातही आले आहे (सोबत यादी दिली आहे). ही सर्व नाणी वैध चलन असून ती व्यवहारांमध्ये स्वीकारता येऊ शकतात. भारतीय रिझर्व बँकेने भूतकाळात, एक वृत्तपत्र निवेदन (नोव्हेंबर 20, 2016) देऊन, रु.10 मूल्याची नाणी, सर्व व्यवहारांमध्ये कोणतीही हयगय न करता, वैध चलन म्हणून स्वीकारण्याची विनंती जनतेला केली होती. रिझर्व बँकेने बँकांनाही सांगितले आहे की, त्यांनी त्यांच्या सर्व शाखांमध्येही व्यवहार व विनियमासाठी ही नाणी स्वीकारावीत. ह्या नाण्यांवरील अधिक माहितीसाठी कृपया पुढील लिंकला भेट द्या - /en/web/rbi/press-releases
जोस जे कत्तूर वृत्तपत्र निवेदन : 2017-2018/1950 |
पेज अंतिम अपडेट तारीख: